मतदार संघाचे प्रारब्ध ठरविण्याचा अधिकार कुणी दिला ; जिल्ह्यातील जनताच प्रारब्ध ठरविणारा – बजरंग सोनवणे

- Advertisement -
- Advertisement -

 

 

*जरा सबुरीने घ्या, औकात काढलं तर जनता जागा दाखवेल*

मतदार संघाचे प्रारब्ध ठरविण्याचा अधिकार कुणी दिला ; जिल्ह्यातील जनताच प्रारब्ध ठरविणारा – बजरंग सोनवणे*

बीड

Beed loksabha bajarang sonavane nomination देशात शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार आणि संविधान वाचविण्यासाठी प्रचंड प्रमाणात लाट आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या ३२ ते ३५ जागा निवडून येण्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीड येथे बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.

तर लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी थेट पालकमंत्राना आव्हान देत म्हटले की, पालकमंत्री महोदय तुम्ही आमची औकात काढू नका. आमची औकात काय आहे? हे आम्ही दाखवून दिलेले आहे. ज्या स्व. मुंडे साहेबांनी राज्यातील २५ साखर कारखाने यशस्वीपणे चालविले. ते सर्व तुम्ही बहीण भावाने बंद केले. त्यांनी काढलेले तीन साखर कारखाने देखील बंद पाडले. तर मी एक सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या सामान्य व्यक्ती दोन कारखाने यशस्वीपणे चालवीत असून मराठवाड्यात विक्रमी भाव देत आहे. ही आमची औकात आहे. तसेच भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मी मॅनेज नसून मरते दम तक शरद पवार साहेबांच्या विचारांचा पाईक राहील असे अभिवचन त्यांनी दिले.

पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देणं हा आपल्या सर्वांचा स्वाभिमान- पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन

या कार्यक्रमाला खा रजनीताई पाटील राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे , शिवसेना उबाठा किशोर पोतदार , राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष महेबूब शेख , जिल्हाध्यक्ष तथा आमदार संदीप क्षीरसागर , माजी आमदार पृथ्वीराज साठे, बबन गित्ते, फुलचंद कराड, नरेंद्र काळे, संगीता चव्हाण, अजिंक्य चांदणे, धम्मपाल कांडेकर, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार बदामराव पंडित, ईश्वर मुंडे, रत्नाकर शिंदे, परमेश्वर सातपुते, भाई मोहन गुंड, ॲड. गोले, माजी आमदार उषाताई दराडे, सुदामती गुट्टे, शिवराज बांगर, सुशीला मोराळे, पूजा मोरे, विजय साळवे, दीपक केदार, कॉम्रेड नामदेव चव्हाण, गणेश वरेकर, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनील धांडे, माजी आमदार सिराज देशमुख, अजय बुरांडे , हेमा पिंपळे , शिवाजीराव कांबळे, दादासाहेब मुंडे यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.

२२ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि इंडिया विकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. रजनीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. त्यानंतर राष्ट्रवादी भवन या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्याची संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीच्या ३२ ते ३५ जागा निवडून येणार आहेत. देशांमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचंड मोठ्या सभा होत आहेत. लोकांचं मत आता महाविकासकडे वळत आहे. आमच्याकडे नेते जास्त नाहीत. पण जनता मात्र प्रचंड प्रमाणात आमच्याकडे आहे. याची दक्षता घेण्याचा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तर बजरंग बप्पा सोनवणे हे बीड लोकसभेला निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. सलग पंधरा वर्षे भाजपची सत्ता असताना ते जिल्ह्याचा विकास करू शकले नाहीत. त्यांची अकृतीशीलता असून भाजप जिल्ह्यातील जनतेने दिलेल्या जबाबदारी पेलू शकले नसल्याचा आरोप त्यांनी केला. देशात संविधान वाचवायचे असेल आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचार आणि संविधान वाचविण्यासाठी या देशात भाजप विरोधी लाट निर्माण झाली आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर जीएसटीने शेतकरी शेतमजूर आणि सामान्य जनता हैराण झालेली असून त्यातून महाविकास मुक्त करू शकते. असा विश्वास व्यक्त केला. आत्ता पर्यंत देशात काँग्रेस आणि समविचारी पक्षाने केलेला विकास याला शून्य ठरविण्याचे कटकारस्थान मोदी कटकारस्थान करीत असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला. तसेच जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचे अभिवचन देखील त्यांनी यावेळी दिले. भाजपच्या नेत्यांनी टीकाटिपणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर बोलावं असा देखील सल्ला त्यांनी भाजपला दिला.

यावेळी बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की, आता नेते नव्हे तर जनता आमच्या सोबत असून भाजप सरकार हे सत्तेच्या पाचपट सत्तेचा गैरवापर करीत आहे. निवडणुक ही गैरविश्वासाच्या मुद्द्यावर लढविली जात असून मी मॅनेज असल्याचा माझ्यावर आरोप होतोय. परंतु मी मरते दम तक शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचाराचा पाईक असून मी मॅनेज होणार नाही. असाही त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला. त्याच बरोबर पालकमंत्र्याचा विधानाचा समाचार घेताना ते म्हणाले की, मी जरूर माझी छाती पडून धनंजय मुंडे आणि अजित दादा हे छातीत असल्याचे म्हणालो परंतु आणखी चार महिन्या नंतर निवडणूक संपल्या नंतर ते दोघेही शरदचंद्र पवार यांच्या पक्षात येतील. परंतु त्यांना पक्षात घ्यायचे किंवा नाही हे आम्ही ठरवू. तसेच अहमदनगर ते परळी रेल्वे मार्ग विषयी बोलताना त्यांनी सांगितले की हा रेल्वे मार्ग २५६ किलोमीटर पासून १५ वर्षां मध्ये केवळ ९९ किलोमीटरचे काम पूर्ण झालेलं आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी २५ वर्षे लागतील. म्हणजे किमान दोन पिढ्या तरी हा रेल्वे मार्ग पूर्ण होणार नाही. परंतु मी निवडून आल्या नंतर अवघ्या दोन वर्षांमध्ये ही काम पूर्णत्वाकडे घेऊन जाईन. त्याच बरोबर राष्ट्रीय महामार्गाची काम १० वर्षांत तरी पूर्ण होऊ शकलेले नाही. या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे २ हजार लोकांची जीव जाऊन अनेकजण जखमी व जायबंदी झालेले आहेत. ज्या पंकजाताई म्हणायच्या की, पुढच्या लोकसभेची निवडणूकीचा अर्ज भरताना मी रेल्वेने फॉर्म भरायला येईन. त्या खरच रेल्वेने उमेदवारी अर्ज दाखल करायला येणार का? असाही प्रश्न त्यांनी पंकजाताई मुंडे यांचे नाव न घेता केला आणि ज्या पंकजाताई म्हणत होते की मी प्रीतमताई चे ताट ओढून घेणार नाही. मग त्यांनी सख्ख्या बहिणीचं ताट का ओढून घेतलं? यासाठी त्यांच्यावर कोणाचा दबाव होता? याचे उत्तर त्यांनी देण्याची मागणी केली. पालकमंत्र्या विषयी बोलताना म्हणाले की, पालकमंत्री जरा सबुरीने घ्या. आमची औकात काढू नका. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी राज्यातील २६ साखर कारखाने चालवले आणि तीन स्वतः काढले. ते कारखाने बंद करण्याचे पाप या मुंडे कुटुंबीयांनी केले असून मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबद्दल आहे. तरी मी दोन कारखाने यशस्वीपणे चालू मराठवाड्यात सर्वाधिक भाव देत आहे. तसेच जिल्ह्यातील जनतेचा प्रारब्ध ठरविणारा कोणी माईचा लाल जन्माला आलेला नाही. मग तुम्ही प्रारब्ध ठरविणारे कोण ? असाही जळजळ सवाल त्यांनी केला. तसेच टीका करायचे असेल तर होऊन जाऊ द्या. घोडा मैदान जवळ आहे. तसेच मी कशाची शेती करतो? त्याचा तपास करू असं म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना जवाब देत बजरंग बप्पा म्हणाले की माझ्या शेतात काय पिकतं ? आता पर्यंत तुम्ही कसं बघितलं नाही. दुर्बीण लावून बघा. आम्ही पण बघतो. तुम्ही बहिण भाऊ एक झालात पण कार्यकर्त्यांनी काय करायचं ? तसेच मतदारसंघात मी उसाचे राजकारण कधी करणार नाही. असाही शेतकऱ्यांना विश्वास त्यांनी यावेळी दिला.

————————————————–

*कोण काय म्हणाले ? :-*

————————–

*खा. रजनीताई पाटील – ही लढाई हि आता विचारधारेची लढाई आहे. त्यामुळे मतदान खूप विचारपूर्वक करावे लागणार आहे. बजरंग बप्पा सोनवणे हे निवडून आल्या नंतर आम्ही दोघे समविचारी पक्षाचे असल्याने जिल्ह्याचा विकास पूर्ण ताकदीनिशी करू. तसेच बजरंग सोनवणे हे आपले भाऊ आहेत.*

———–

*महेबुब शेख – भाजप पक्ष म्हणजे मलिदा गॅंग आहे आणि आमची लढाई बेरोजगारी व भ्रष्टाचार यांच्या विरोधात आम्ही लढत आहोत. तसेच पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते म्हणतात की ताईंना मंत्रीपद करत देण्यासाठी लढत आहेत; परंतु महानगरपालिकेच्या पडलेले भागवत कराड यांना मंत्री पद दिले आणि रमेश आप्पा कराड यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार केलं. परंतु ताईंना कोणतं पद दिलं नाही. तसेच जे अधिकारी सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत त्यांची व्याजा सहित वसुली केली जाईल. असा सज्जड इशारा महबूब शेख यांनी दिला.*

————

*दीपक भाई केदार :-* आम्ही संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडी सोबत आहोत जर आम्ही सोबत राहिलो नाही तर भाजप संविधान संपवले.

———-

*कॉ. नामदेवराव चव्हाण – पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे दिशाभूल करीत असून त्यांची दिशाभूल रोखण्याचे काम आपल्याला करायचे आहे. मोदी व शाहा यांच्या विचारला देशातून तडीपार करा.*

——-

*गणेश वरेकर – ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना आता कल गाडण्याचे वेळ आलेली आहे*.

————-

*फुलचंद कराड – पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांचे खासदारकीच्या उमेदवारीचे ताट स्वतः ओढून घेतलं आहे. त्यांनी त्यांचा शब्द पाळा नाही आणि ईडीच्या भीतीपोटी त्यांनी लोकसभेची उमेदवारी स्वीकारली आहे.*

————

*ॲड. हेमा पिंपळे – शरदचंद्र पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलेले असून शेतकरी पुत्र बजरंग बप्पा यांना मतदार संघाचा विकासाचा अनुशेष भरण्यासाठी लोकसभेला निवडून द्या तसेच बेटी बचाव बेटी पढाव म्हणणार आहे भाजप महिलांनी महिलांकडून अत्याचार करीत आहेत.*

————-

*माजी आमदार बदामराव पंडित – ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली असल्याने त्यांचा विजय कोणी रोखू शकत नाही.*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles