Homeताज्या बातम्याडीझेल टँकर आणि दुचाकीच्या धडकेत दोन जण जागीच ठार

डीझेल टँकर आणि दुचाकीच्या धडकेत दोन जण जागीच ठार

कडा ,

tankar motorcycle accident near doithan बीड हून नगरकडे जाणाऱ्या डीझेल टँकर आणि दुचाकीच्या धडकेत दोन जण जागीच ठार झाल्याची घटना बीड नगर महामार्गावर आष्टी तालुक्यातील डोईठाण जवळील शिवनेरी चौकात घडली.

याठिकाणी तीन रस्ते एकत्र येत असल्याने हे ठिकाण अपघाताचे बनले आहे.पाटोदा तालुक्यातील सकुंडवाडी येथील महादेव गायकवाड हे कडा येथून काम आवरून धामणगाव मार्गे गावाकडे जात असताना धामणगाव येथे डोईठाण येथील अनिल विठ्ठल तरटे वय 19 या युवकाने लिफ्ट मागितली.

बीड लोकसभेसाठी या नेत्याने केला उमेदवारीचा दावा

गायकवाड याने लिफ्ट दिली, दोघेही दुचाकीवरून जात असताना  सायंकाळी चारच्या दरम्यान जात असताना  बीड येथे डिझेल खाली करून अहमदनगरच्या दिशेने जात असलेला टँकर क्रमांक एम एच सोळा सी सी 76 31 याची जोरात धडक दुचाकीला बसल्याने झालेल्या अपघातात या  दोघांचा जागीच मृत्यू झाला.

धडकून पळून जात असलेल्या या  टँकर चालकाला  कडा चौकीच्या पोलिसांनी टँकर चालकाला टँकर सह ताब्यात घेतले आहे.  अपघाताचे वृत्त समजताच नागरिकांनी धाव घेत  मदतीसाठी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments