Ashti Science exhibition विज्ञान प्रदर्शनात मोतीलाल कोठारी विद्यालयाचे यश
आष्टी,
Ashti Science exhibition आष्टी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयातील ऍक्सीडेन्ट प्रिव्हेंटिंग प्रोजेक्टने बाजी मारली. माध्यमिक विभागातून विद्यालयातील प्रथम क्रमांक मिळवला आहे.
फिनिक्स स्कुल मध्ये जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गुंड आणि फिनिक्स स्कूल चे संस्थापक नागसेन कांबळे, मुख्याध्यापिका सीमा मॅडम यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.यावेळी निशिगंध सर व सर्व परीक्षक उपस्थित होते.
फिनिक्स इंग्लिश स्कूल येथे पार पडलेल्या 51 व्या विज्ञान प्रदर्शना मध्ये अमोलक जैन शिक्षण प्रसारक मंडळाच्या मोतीलाल कोठारी विद्यालय ने माध्यमिक विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. accident preventing project हा इयत्ता दहावी मधील एकशिंगे गौरव बिबीशन आणि जगताप शुभम गोरख यांनी हा प्रोजेक्ट मार्गदर्शक शिक्षक राऊत कुलदीप भारत यांच्या मार्गदर्शना खाली केला होता.
हा प्रोजेक्ट घाट सेक्शन मधील किंवा दाट जंगलां मधील किंवा शहरां मधील यू टर्न वर किंवा ब्लाइंड स्पॉट्स वर हा प्रोजेक्ट उपयोगी येतो. अशा ठिकाणी हा प्रोजेक्ट अॅक्सिडेंट वाहनांचा accident होण्या पासून वाहनांचा बचाव करू शकतो.
यानिमित्ताने वाहनांचा अॅक्सिडेंट कमी होईल. त्यामुळे हॉस्पिटलायझेशन कमी होईल आणि त्यामुळे नागरिकांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. या प्रोजेक्ट मध्ये विद्यार्थ्यांनी. Push स्विच किंवा आय आर सेन्सर्स किंवा प्रेशर प्लेट यांचा उपयोग करून घाटामध्ये किंवा यू टर्न सुरू होण्या च्या अगोदर राईट आणि लेफ्ट साइड ला. Push स्विच असतील, वाहनाच्या ओझ्या खाली प्रेस होईल.
यामुळे opposite साइड कडून येणारा वाहनाला ला सिग्नल मिळेल. वॉर्निंग सिग्नल मिळेल त्यानंतर रेड सिग्नल मिळेल की ज्याच्या मुळे दुसरे वाहन opposite साइड ला असला तरीही त्याला कळेल आहे त्याला हे कळेल की पलीकडून आणखी एक वाहन की जे ब्लाइंड स्पॉट वरती आहे यामुळे ॲक्सिडेंट कमी होऊ शकेल.
प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि मुख्याध्यापक एम इ शिकारे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.