माझ्या बाप्पाची अली हो स्वारी…’ या नव्या गाण्याचे उत्साहात लोकार्पण

- Advertisement -
- Advertisement -

Ganpati song, माझ्या बाप्पाची अली हो स्वारी…’ या नव्या गाण्याचे उत्साहात लोकार्पण

नगर

Ganpati song,येत्या १९ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवा निमित्त श्रीगणेशाचे स्वागत व गुणगान करणाऱ्या गोड नैव्यद्याची झाली तैयारी… लगबग लगबग उत्साह भारी…. माझ्या बाप्पाची अली हो स्वारी… या नव्याकोऱ्या Ganesh songs download, गाण्याचे लोकार्पण शहराचे ग्रामदैवत श्री विशाला गणपती मंदिरात उत्साहात झाले.

नगरचा हरहुन्नरी गायक गिरिराज जाधव यांनी गायलेले या भक्तिगीताचे लोकार्पण मंदिराचे पुजारी संगमनाथजी महाराज यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आदेश चंगेडिया, गाण्याच्या गीतकार सिद्धी ढोके, गौतम मुनोत, पवन गांधी, गायक पवन नाईक, सागर पवार आदींसह नागरिक उपस्थित होते.

नरेंद्र फिरोदिया म्हणाले, गिरीराज जाधव हा नगर मधील उभरता उत्तम गायक आहे. त्याने गायलेल्या श्रीगणेशाचे स्वागत करणाऱ्या नव्या गाण्याचे Ganpati songs, चे  लोकार्पण आपल्या ग्रामदैवत श्री विशाल गणेशाच्या मंदिरात झाल्याने येत्या गणेशोत्सवात हे गाणे नक्कीच हिट होईल, अशी खात्री व्यक्ती केली.

आदेश चंगेडिया म्हणाले, नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती हे जागृत देवस्थान आहे. अशा जागृत स्थळी गिरीराजच्या गाण्याचे लीकार्पण झाल्याने हे गाणे Ganpati songs, नागरिकांच्या पसंतीस उतरेल. गणपती बाप्पाचे हजारो जाने अजरामर झाली आहेत. गिरीराजचे हे गाणेही असेच अजरामर व्हावे, अश्या शुभेच्छा दिल्या.

गाण्या विषयी माहिती देताना देताना गायक गिरीराज जाधव म्हणाले, २२ ऑगस्टला गीतकार सिद्धी ढोके यांनी मला या गाण्याचे बोल पाठवले. हे बोल वाचता वाचताच गाण्याची चाल जन्माला आली. संगीतकार सत्यजित केळकर यांनीही लगेचच सुंदर संगीताने या गाण्यास सजवले त्यामुळे ३० ऑगस्टला हे गाणे तयार ही झाले. आता हे Ganesh songs, गाणे इंस्टाग्राम, फेसबुक म्युझिक सह सर्व ऑडीओ प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. सर्व नागरिकांनी या गाण्यास प्रतिसाद द्यावा.

गीतकार सिद्धी ढोके म्हणाल्या, बाप्पावरची भक्ती सहज व सोप्या शब्दातून मी या गीतामधून मांडली आहे. ओठांवर बसणारी अनुरूप चाल गिरीराजने लावत सुंदर आवाजात हे गाणे गायले आहे. केवळ १५ दिवस एवढ्या कमी कालावधीत हे गाणे तयार झाले आहे.

यावेळी गौतम मुनोत, पवन गांधी, पवन नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. प्रा.प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले. यावेळी संगीत, नाट्य, सामाजिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles