या भागातील शेतकऱ्यांना लागली लालचुटुक फळांची गोडी !

- Advertisement -
- Advertisement -

 

पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्या सारख्या अतिदुर्गम भागातले शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागलेत स्ट्रॉबेरी ची शेती

पालघर

आदिवासी जिल्हा म्हटले की,मागासलेले शेतकरी असा समाज असतो पण आता हे मागासलेपण झटकून शेतकरी चक्क Strawberry fruit ची शेती करू लागलाय.

शेती करणे हे जिकरीचे काम असते. आधुनिक शेतीची कास धरणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्याही भागात आणि कोणत्याही वातावरणात Strawberry Plant ची जोपासना करता येऊ शकते.

कुपोषणाच्या समस्येसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या पालघर जिल्ह्यातल्या जव्हार-मोखाडा भागांत एकेकाळी पावसाळ्यात केवळ आणि केवळ भातशेती केली जात असे.
पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागांत असलेल्या या मोखाडा तालुक्यातले शेतकरी भात शेती बरोबरचं आता स्ट्रॉबेरी या फळाची देखील यशस्वी Strawberry farming शेती करू लागले आहेत.

Strawberry farming
Strawberry farming

मोखाडा कृषी विभागाकडून, बायफ आणि एस.के.फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन मोखाडा तालुक्यातल्या चार गावातल्या 12 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 30 गुंठा जागेत Strawberry Tree स्ट्रॉबेरी फळाची लागवड केली आहे. यातल्या प्रत्येक शेतक-यांनी आपापल्या शेतात दिड गुंठयाच्या क्षेत्रात या स्ट्रोबेरी ची लागवड केली आहे. या स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी मोखाडा कृषी विभागाचे कृषि अधिकारी सुनील पारधी, बायफ आणि एस.के.फाउंडेशनने शेतक-यांना तयार केलं. आणि त्यानंतर या शेतकयांनी नाशिक आणि इतर काही ठिकाणी जावून Strawberries ची लागवड कशी केली जाते, फवारणी कशी केली जाते, विक्री कशी करायची, पैकिंग कशी करायची यासारख्या विषयांबाबत प्रशिक्षण घेवुन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती घेतली.

 

या स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी बायफ, एस.के.फाउंडेशनने प्रत्येक शेतक-याला एक- एक हजार रोपं लागवडीसाठी दिली होती.त्यानंतर या शेतक-यांनी आपल्या मेहनतीने स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली असून हे फळ चांगल्या प्रकारे तयार होऊन बाजारात विक्रीसाठी जात आहे.

Plant of Strawberry
Plant of Strawberry

Strawberry fruit मधून मिळतोय आर्थिक फायदा

दरम्यान त्यातून ते दिवसाकाठी आठशे ते एक हजार रूपये उत्पन्न मिळवत आहेत. एकुणच सर्व खर्च वगळता या शेतीतुन शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळत असून सर्व शेतक-यांचा एकत्रित विचार करता चार ते साडेचार लाख रुपयांचं उत्पन्न या शेतक-यांना मिळत आहे.

Strawberry
Strawberry

Strawberry हे जवळपास तीन ते चार महिन्यांचं हे पिक असून इथल्या शेतक-यांनी विंटर डॉन जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. फळ खराब होऊ नये म्हणून मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला आहे. या शेतीसाठी गांडूळ खत, शेणखत, गांडूळ खताचे अर्क यासारख्या खतांचा वापर करण्यात आला असून ही शेती संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करण्यात आली आहे. तसचं पाण्यासाठी ड्रिप पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. या स्ट्रोबेरीला जिल्ह्यातल्या विविध भागांसह नाशिक, मुंबई आणि दादर मार्केट मध्ये ही चांगल्या प्रकारे बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

Benefits Of Strawberries
Benefits Of Strawberries

या शेतीतुन मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्यानं इथला शेतकरी आता प्रगत होत आहे. आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आर्थिक दृष्ट्या सक्षम देखील होऊ लागला आहे. आता येथील शेतकऱ्यांना Benefits Of Strawberries चे लाभ दिसू लागले आहेत. शेतीसंबंधी आणि दैनदिन गरजेच्या

माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा !

       इथे क्लिक करा

 

त्यामुळे अशा प्रकारे जर इथले शेतकरी विविध फळ पिकाच्या, फुल पिकाच्या शेतीकडे वळू लागले आणि या माध्यमातून जर त्यांना गावातच रोजगार उपलब्ध होऊ लागला तर येत्या काळात इथली स्थलांतर आणि कुपोषणाची मोठी समस्या नाहीशी होऊ शकेल.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles