उजनीत हेलिकॉप्टर माशांचा प्रादुर्भाव : मासेमारीला फटका
खरपा, सकर मासा,सेलफिन फिश हे अन्य नावे
सोलापूर प्रतिनिधी
helicopter fish problem नेहमी अत्यल्प प्रमाणात उजनी जलाशयात आढळणारा ‘हेलिकाॅप्टर’ मासा यंदा तुलनेने जास्त प्रमाणात आढळत असल्यामुळे मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे.
खरपा, सकर मासा,सेलफिन फिश, या नावाने हेही हा मासा ओळखला जातो.
शरीरावर सुरेख व आकर्षक नक्षीदार खवले असलेल्या या माशाला स्थानिक खरपा (सकर मासा या नावानेही ओळखतात. हे मासे सध्या मासेमारी करणाऱ्या जाळीत मुबलक प्रमाणात सापडत आहेत व जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागल्याने मासेमारी करणारे त्रस्त झाले आहेत.
या 9 जिल्ह्यातील विद्यार्थी शिकणार कोडींग
मच्छीमारांच्या जाळ्यात हा मासा अडकल्यानंतर तो मासा सहजासहजी जाळ्यातून निघत नाही. त्यासाठी जाळी फाडावी लागते. त्यामुळे जाळ्यांचे मोठे नुकसान होते. खाण्यास विषारी असलेला या माशाला मच्छी मार्केट मध्ये मागणी नसते. तरी सामान्यपणे 15 ते 20 रुपये प्रती किलो दराने व्यापारी घेतात. मासळीखत तयार करण्यासाठी या माशांचा उपयोग केला जातो असे सांगितले जाते.
helicopter fish सकर अर्थात खरपा (हेलिकॉप्टर) माशाचे वैशिष्ट्ये –
या माशात पोहण्यासाठी असलेले सर्व पर हे पंख्याच्या पात्याप्रमाणे विकसित झालेले असून त्यात टोकदार काटे असतात. पाठीवरील पर हे होडीला बांधलेल्या शिडासारखे असते म्हणून इंग्रजीत या माशाला सेलफिन फिश असे नाव आहे.
काटेरी पर व शरीरावरील खवले हे विषारी असून त्यांच्या स्पर्शने सूज येते. या माशांच्या शरीरात फुफ्फुसासारखे हवेच्या पिशव्या असल्यामुळे तो पाण्याबाहेर तासभर जीवंत राहू शकतो. त्यांचे तोंड गोलाकार असून त्याचे कडा चिकट द्रव स्त्राव करणाऱ्या ग्रंथींचे भरलेले असतात. शेवाळ व इतर छोटे मासे व माशांची अंडी या माशांचे प्रमुख खाद्य आहे.
या माशांना पाण्याच्या तळाशी असलेल्या चिखलात राहायला आवडते. हा मासा साधारणपणे 200 ते 250 ग्रॅम वजनापासून 350 ते 400 ग्रॅम वजनाचा आत्तापर्यंत सापडलेला आहे यापुढे त्याचे वजन वाढते की नाही हे मात्र कळू शकले नाही.
टेरिगेप्लिथिस मल्टीरेडिएटा’ असे वैज्ञानिक नाव असलेला हा मासा कॅटफिश,catfish, या गटात मोडतो. याबाबत अकलूज येथील प्राणिशास्त्र अभ्यासक डॉ.अरविंद कुंभार यांनी सांगितले कि,यावर्षी अतिवृष्टीमुळे उजनी जलाशयात पाण्याचे आवक प्रचंड प्रमाणात झालेली आहे. परिणामी वर्षानुवर्षे साठून राहिलेले मृतसाठ्याच्या ठिकाणी नवीन पाणी आल्यामुळे सर्वच प्रकारच्या माशांना पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे खरपा मासे सुद्धा विपुल प्रमाणात वाढले आहेत.