अकोले,ता.१५ प्रतिनिधी
एक दशक सुरु होऊनही निळवंडे जलाशयाच्या मागील बाजूस असलेल्या पिंपरकणे पुलाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. निधी अभावी ते गेली आठ महिन्यांपासून बंद आहे. .नुकतेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निळवंडे जलाशयाला भेट दिली.कालवे कामाला गती दिली जाईल असे स्पष्ट केले.
आधी पुनर्वसन मग धरण हा निळवंडे पॅटर्न राज्यभर प्रसिद्ध झाला. मात्र ज्या आदिवासींनी स्वतः धरणग्रस्त होऊन निळवंडे जलाशयाची निर्मितीला बळ दिले.ते आदिवासी गावे आज पिंपरकणे पुल अपूर्ण असल्याने सुमारे वीस गावाचा संपर्क तुटला आहे.
शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.तर वाहतूक बंद झाल्याने पुल ते राजूर हा रस्ता खराब झाल्याने व खड्डे पडल्याने चालणे मुश्किल झाले आहे.
पुलाच्या रखडलेल्या कामामुळे जवळपास २० गावांच्या दळणवळणावर परिणाम झाला होता. आदिवासी प्रकल्पग्रस्तांना जीव मुठीत घेऊन होडीने प्रवास करावा लागत आहे.
त्या परिसरातील २० गावांनी आपले व्यवहार बंद करून नाशिक जिल्ह्यातील घोटी व अकोले येथे व्यवहार सुरू केल्याने राजूर बाजारपेठ बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
या पुलाच्या भूमिपूजनानंतर निळवंडे धरण पूर्ण होण्यापूर्वी हा पूल करण्यात येईल, असे आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. तर तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनीही १२डिसेंबर१२ रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसाला या पुलाचे उद्घाटन करून धरणग्रस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन दिले होते.
मात्र, आजपर्यंत पिंपरकणे या पुलाचे काम रखडले. पूल नसल्याने या भागातून राजूरला लोक होडीतून जीव मुठीत धरून येतात. तर बहुतांशी गावातील लोक अकोले, घोटी या शहरांशी संपर्क ठेवून आहेत.
थेट धरणाच्या जलाशयातून जाणारा एकमेव व पहिलाच पूल
राज्यात थेट धरणाच्या जलाशयातून जाणारा एकमेव व पहिलाच ५६० मीटर लांबीचा हा पिंपरकणे पूल असून ची ६२.४५ मीटर आहे. पुलास १४० मीटर लांबीचे चार गाळे असतील. पुलाची रुंदी दहा मीटर आहे. साडेसात मीटर रुंदीच्या पुलास एका बाजूने अडीच मीटर रुंदीचा खास पादचारी मार्ग ठेवण्यात येणार आहे.
धरणाच्या पाण्यावरून जाणारा हा अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा पूल तालुक्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार आहे. धरण जलाशयात बुडीत होणाऱ्या रस्त्यामुळे पिंपरकणे, टिटवी, या भागातील वीस हजार लोकांना त्यामुळे लाभ होणार आहे.
या पुलामुळे येथील भूमिपुत्रांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी
मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.
सध्या या पुलाचे केवळ १२ मोठे पिलर उभे असून निधीअभावी काम बंद आहे.
केवळ ५००फूट स्लॅब काम झाले असून पुढील निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे.
मधुकर पिचड, माजी मंत्री.
माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या प्रयत्नाने हा राज्यातील पहिला पुल झाला. मात्र सरकार याकडे लक्ष्य देत नाही. त्यामुळे धरणग्रस्तांना पाण्यात आंदोलन करावे लागेल. त्यापूर्वी निधी उपलब्ध करून द्यावा. मुरलीधर भांगरे
आधी पुनर्वसन मग धरण अशी वल्गना करणाऱ्या आघाडी सरकारने व त्यांच्या लोक प्रतिनिधींनी जाणीवपूर्वक हा पूल रखडविला असून लवकरच हा निधी आणून पुलाचे काम सुरू करावे .
[…] हेही वाचा :आघाडी सरकार आणि त्यांच्या ल… […]