विद्यार्थ्यांना ऐच्छिक सीईटी; अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी असणार?

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई ।प्रतिनिधी

राज्यातील दहावी पास होऊन अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कसा प्रवेश मिळू शकतो यासाठी राज्य सरकारने काही मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे.यानुसार प्रवेश सीईटी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे.मात्र परिक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.त्या मुळे ही परीक्षा ऐच्छिक असणार आहे.

इ.१० वी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता इ.अकरावी प्रवेश एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी  वैकल्पिक (optional) सामाईक प्रवेश परीक्षा (CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल. ही अकरावी प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असून परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी खालील माहिती जाहीर करण्यात आली आहे.

परीक्षासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी

CET राज्य मंडळाच्या  इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. सदर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसेच OMR पद्धतीने २ तासांची परीक्षा घेण्यात येईल. यात इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा offline घेण्यात येईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळांच्या म्हणजेच राज्य मंडळ, CBSE, CISCE व सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करण्यात येईल. शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही अकरावी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ / परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल. इयत्ता १० वीचा निकाल साधारणत: १५ जुलै दरम्यान लागल्यानंतर राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी  इ. १० वीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने त्यांना CET साठी शुल्क भरावे लागणार नाही. तथापि अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना विहित करण्यात आलेले शुल्क अदा करावे लागेल.

हेही वाचा: भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे का करणार राज्यात आंदोलन

कशी असणार अकरावी प्रवेश प्रक्रिया

इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबवताना विद्यार्थ्यांना CET मधील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. CET दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त जागांवर संबंधित परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इ. १० वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. सन २०२०-२१ वर्षासाठी इ. अकरावी प्रवेश ऑनलाईन प्रवेशासंबंधी आकडेवारी (पहा परिशिष्ट अ) पाहता लक्षात येते की, उपलब्ध जागांपैकी सुमारे ३२ टक्के जागा शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे यावर्षीही सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याबाबत कोणतीही अडचण येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले.

हेही वाचा:अभिनव खान्देश प्रेरणादायी महिला पुरस्कार २०२१ जाहिर;शर्मिला गोसावी,गुंफा कोकाटे,स्वाती राजेभोसले,रिता जाधव,सरोज आल्हाट

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles