Homejobsरोजगार मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक तरुणातून उद्योजक घडणार-उद्योगमंत्री उदय सामंत

रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक तरुणातून उद्योजक घडणार-उद्योगमंत्री उदय सामंत

शिर्डी, दि.९

shirdi minister uday samant employment ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना केवळ नोकरी मिळवून देणे हा रोजगार मेळाव्याचा उद्देश नसून, त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि स्थानिक पातळीवर उद्योजक घडवण्यासाठी पाठबळ देणे हा आहे.” असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

आत्मा मालिक संकुल कोकमठाण येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


या रोजगार मेळाव्यास खासदार भाऊसाहेब वाकचौरे,राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे,आमदार विठ्ठलराव लंघे,आमदार अमोल खताळ,आमदार विवेक कोल्हे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,आत्मा मालिकचे परमानंद गिरीजी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.


ग्रामीण तरुणांच्या हाताला काम आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी’


आनंद नोकरी मेळावा २०२६‘ चे आयोजन करण्यात आले होते.या रोजगार मेळाव्यात पाच तरुणांना उद्योगमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आले.
ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या कौशल्यविकासाला आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंद नोकरी मेळावा २०२६’ च्या माध्यमातून युवकांसाठी रोजगाराचे नवे मार्ग खुले झाले आहेत.

या मेळाव्यादरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. यात मान्यता पाटील, मेघना ऋषिकेश, साईराज पाटील आणि पायल पवार या तरुणांना नामांकित ‘जेसीबी’ कंपनीमध्ये, तर समीर राऊत याला ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या अग्रगण्य कंपनीमध्ये नियुक्तिपत्रे देण्यात आली.

‘आनंद नोकरी मेळावा २०२६’ मुळे परिसरातील शेकडो तरुणांना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध झाल्या असून, आगामी काळातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना मुख्य प्रवाहात आणले जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


ग्रामीण तरुणांना एकाच व्यासपीठावर रोजगाराच्या संधी


ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासू नये, या उद्देशाने एकाच व्यासपीठावर विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. देशातील नामांकित कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या असून, सुमारे १२५ कंपन्यांच्या माध्यमातून पाच हजार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.


तरुणांच्या कौशल्यावर आधारित भरती प्रक्रियेला प्रोत्साहन देणे आणि बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments