अहिल्यानगर
Rahuri assembly byelection date राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने केली.
स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा निवडणुकीची जागा रिकामी झाली तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाली.
या दोन्ही मतदार संघाची निवडणूक 23 एप्रिल रोजी होत असून मतमोजणी चार मे रोजी होणार आहे.
REAd more : श्रीगोंदे येथे डाकूने लोकांचे लक्ष वेधले
यासंदर्भात निवडणूक आयोगाने आज दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली.
या संदर्भातील पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम 30 मार्च रोजी जाहीर केला जाणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल असणार आहे त्यानंतर 7 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून 23 एप्रिल रोजी निवडणूक पार पडणार आहे.
कधी आहे राहुरी विधानसभेची पोट निवडणूक ?
राहुरी विधानसभेची पोट निवडणूक 23 एप्रिल रोजी होत आहे.
का होत आहे पोट निवडणूक
स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा निवडणुकीची जागा रिकामी झाली तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाली.
या निवडणुकीचे उमेदवार कोण असणार ?
या निवडणुकीत भाजपा कडून अक्षय कर्डिले किंवा प्राजक्त तनपुरे निवडणूक लढवू शकतात .