साईबाबांच्या मुकुटावर 648 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट

648 gram gold crown on Sai Baba's crown
648 gram gold crown on Sai Baba's crown

648 gram gold crown on Sai Baba’s crown श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज एका साईभक्ताने साईचरणी ६४८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. या सोनेरी मुकूटाची किंमत ४२ लाख ८० हजार रुपये असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षिकाम असलेला सुवर्णजडीत मुकुट साईबाबांच्या मुर्तीवर चढवण्यात आला. मुर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशुर साई भक्‍ताने संस्थानला आपल नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here