4 innkeepers accused of stealing from farms in Parner area पारनेर परिसरात शेतवस्तीवर चोरी करणारे 4 सराईत आरोपी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अंकुश भाऊ भोसले वय 50, रा. खामकर झाप, वडगांव सायताळ, ता. पारनेर हे कुटूंबियासह घरात झोपलेले असतांना अनोळखी 4 इसमांनी फिर्यादीचे घरात प्रवेश करुन अज्ञात हत्याराने मारहाण व जखमी करुन घरातील 69000/- रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेले बाबत पारनेर पो.स्टे. गु.र.नं. 413/2024 भादविक 394, 34 प्रमाणे जबरीचोरीचा गुन्हा दाखल आहे.
पारनेर परिसरात फिरुन गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत इसम नामे मिथुन उंब-या काळे रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा याने त्याचे इतर साथीदारासह केला असुन ते आता त्याचे घरी असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करता संशयीत आरोपी नामे मिथुन उंब-या काळे याचे घराचे मागील बाजुस असलेल्या लिंबाच्या झाडा खाली 5 ते 6 इसम बसलेले दिसले. पथकाची खात्री होताच लिंबाचे झाडा खाली बसलेल्या इसमांना चोहो बाजूंनी घेरुन ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना त्यांना पोलीस पथकाची चाहूल लागुन बसलेल्या इसमांपैकी 2 इसम पळुन गेले त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळुन आले नाहीत. उर्वरीत 4 संशयीतांना ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मिथुन उंब-या काळे वय 23, 2) अक्षय उंब-या काळे वय 26, 3) संजय ऊर्फ संज्या हातण्या भोसले वय 55 सर्व रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा व 4) गंगाधर संदल चव्हाण वय 21, रा. दिवटेवस्ती, वाघुंडे, ता. पारनेर असे असल्याचे सांगितले. त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत विविध प्रकारचे दागिने मिळुन आले. सदर दागिन्याबाबत अधिक विचारपुस करता त्यांनी काही दिवसापुर्वी वडझिरे शिवार, भनगडवाडी व वडगांव सावताळ ता. पारनेर परिसरात चोरी करुन आणले असल्याचे सांगितले.
स्थागुशा पथकाने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता पारनेर पोलीस स्टेशन येथे दाखल खालील प्रमाणे 03 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. पारनेर 147/24 भादविक 392
2. पारनेर 295/24 भादविक 457, 380
3. पारनेर 413/24 भादविक 394, 34
आरोपी नामे मिथुन उंब-या काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व पुणे जिल्ह्यात खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा तयारी, दरोडा व गंभीर दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण 6 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. बेलवंडी 172/18 भादविक 324, 323, 504, 506
2. सुपा 281/19 भादविक 302, 363, 143, 147, 323
3. घारगाव 24/20 भादविक 302, 397, 394, 452
4. बेलवंडी 174/22 भादविक 399, 402
5. आळेफाटा, जिल्हा पुणे 291/22 भादविक 395, 397
6. पारनेर 687/23 भादविक 307, 109, 380, 451, 34
आरोपी नामे अक्षय उंब-या काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात खुन, दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी व गंभीर दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण 13 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. बेलवंडी 150/15 भादविक 376, 354, 504, 506
2. बेलवंडी 107/17 भादविक 324, 323, 504, 506
3. नगर तालुका 109/17 भादविक 394
4. बेलवंडी 94/17 भादविक 457, 380
5. नगर तालुका 258/17 भादविक 457, 380
6. नगर तालुका 263/17 मपोका 122
7. बेलवंडी 172/18 भादविक 324, 323, 504, 506
8. बेलवंडी 211/18 भादविक 457, 380, 34
9. बेलवंडी 98/18 भादविक 399, 402
10. सुपा 281/19 भादविक 302, 363, 143, 147, 323
11. बेलवंडी 174/22 भादविक 399, 402
12. पारनेर 1151/23 भादविक 399, 402
13. एमआयडीसी 495/24 भादविक 399, 402 आर्म ऍ़क्ट 4/25(फरार)
आरोपी नामे संजय हातण्या भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात खुनासह दरोडा, दरोडा तयारी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. कळवण, नाशिक 37/14 भादविक 399, 402
2. पारनेर 49/15 भादविक 399, 402
3. पारनेर 171/16 भादविक 306
4. सुपा 95/16 भादविक 396
5. सुपा 56/18 भादविक 420, 395
6. पारनेर 86/19 भादविक 395
7. पारनेर 976/20 भादविक 395, 397, 120(ब)
8. श्रीगोंदा 1043/20 भादविक 379
9. घारगाव 24/20 भादविक 302, 397, 394, 452
10. बेलवंडी 174/22 भादविक 399, 402
11. पारनेर 1151/23 भादविक 399, 402
आरोपी नामे गंगाधर संदल चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा तयारीचा 1 गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल आहे तो खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. सुपा 159/17 भादविक 399, 402
ताब्यात घेतलेल्या चारहीआरोपींना 3,57,500/- रुपये किंमतीचे 50.5 ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे सोन्या चांदीच्या दागिन्यासह ताब्यात घेवुन पारनेर पो.स्टे. येथे हजर केले आहे. पुढील तपास पारनेर पो.स्टे. करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सपंत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
[…] पारनेर परिसरात शेतवस्तीवर चोरी करणार… […]