श्रीरामपूर (गौरव डेंगळे)
3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन कप साठी महाराष्ट्र संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. दिनांक ११ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान हैदराबाद,तेलंगणा येथे होत असलेल्या फेडरेशन कप स्पर्धेसाठी कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का बनकर हिची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे.
तसेच संघाच्या प्रशिक्षकपदी श्रीरामपूरचे नितीन बलराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरुष संघाचा कर्णधार म्हणून विनित शेट्टी व महिला संघाची कर्णधार म्हणून श्रीया गोठोस्कर यांची निवड करण्यात आली आहे.
फेडरेशन कप स्पर्धेसाठी तेलंगणा,महाराष्ट्र,दिव दमन,गुजरात,छत्तीसगड हरियाणा,पंजाब व मध्य प्रदेश या आठ राज्यांचे संघ सहभागी होणार असल्याची माहिती 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही एस ए राजू व सचिव श्री मारुती हजारे यांनी दिली.
स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी म्हणून क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे काम बघतील. निवड झालेल्या संघाचे गोदावरी बायोरिफायनरीचे (साखरवाडी)अध्यक्ष श्री सुहास गाडगे, प्राचार्य श्री के एल वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे,नेथलीन फर्नांडिस,क्रीडा विभाग प्रमुख डॉ धनंजय देवकर तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..
निवड झालेल्या संघ पुढीलप्रमाणे!
महाराष्ट्र पुरुष संघ : विनित शेट्टी (कर्णधार),मोहम्मद सय्यद,सागर पूजारी,प्रीथमा,रंजित पुजारी,प्रीतम व विशाल यादव
प्रशिक्षक : योगेश तडवी
महिला महाराष्ट्र संघ:श्रीया गोठोस्कर (कर्णधार),संजना गोठोस्कर,उमा सायगावकर,उपतज्ञ कार्ले,अरमान भावे व अनुष्का बनकर.
मुख्य प्रशिक्षक : नितीन बलराज
संघ व्यवस्थापक: गीतांजली भावे