नगर- प्रतिनिधी
बीएचएमएस पदवीचे पासिंग प्रमाणपत्र आणि इंटर्नशिप चे प्रमाणपत्र देण्यासाठी १४७५०० रुपयांची लाच घेताना होमिओपॅथी मेडीकल कॉलेज वडाळा महादेव ता.श्रीरामपूर येथील लिपिकासह प्राचार्यांस अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली.
आणखी वाचा :नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला गती मिळणार?
तक्रारदार यांच्या मुलीचे बी.एच.एम.एस पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पुर्ण केल्याबाबतचे सर्टिफिकेट देणे करिता यातील आरोपी लोकसेवक होमिओपॅथी मेडीकल कॉलेज वडाळाचे प्रभारी प्राचार्य बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे यांनी तक्रारदार व त्यांची मुलगी यांचे कडे ₹ १४७५००/- ची मागणी केली.
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी हरिश्चंद्रे यांनी तक्रारदार व त्यांची मुलगी यांचे कडे बी.एच.एम.एस पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पुर्ण केलेल्या कालावधीच्या हजेरीची ॲडजस्टमेंट करुन सर्टिफिकेट देणे करिता होमिओपॅथी मेडीकल कॉलेज वडाळा महादेव येथे पंचासमक्ष ₹ १४७५००/- ची मागणी केली.
त्यानंतर आयोजित सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम आरोपी हरिश्चंद्रे यांचे सांगणे वरुन आरोपी लोकसेवीका भारती बापुसाहेब इथापे यांनी पंचासमक्ष स्विकारली असता दोन्ही आरोपी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.