कडा,
हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक साहेबराव थोरवे दादा यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोलापूर वाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा समुदाय जमला होता. मृत्युसमयी त्यांचे वय ११७ इतके होते.
आष्टी तालुक्याच्या राजकारणातील भीष्माचार्य तथा थोर स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांची ओळख होती.
केवळ आष्टी तालुक्यातच नाही तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक आयुष्यमान लाभलेले व्यक्तिमत होते.
साहेबराव दादा थोरवे हे गेले पंधरा ते वीस वर्षापासून प्रत्येक हरिनाम सप्ताहास अन्नदानसाठी अर्थसहाय्य करीत असत अन्नदान करणे हा त्यांचा सर्वात मोठा गुण होता.

आष्टी पंचायत समितीचे सलग अकरा वर्ष सभापतीपद तर कडा सहकारी साखर कारखान्याचे सलग आठ वर्षे चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ही ते पंधरा वर्षे संचालक होते. आष्टी तालुक्यात अन्नदाता म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. वयाची शंभरी पार केल्यानंतरही ते तालुक्यातील अनेक गावात फिरत असत. राजकारणातील त्यांनी त्यांचा संपर्क कधीही कमी होऊ दिला नाही.
अशातच गेल्या पंधरा दिवसांपासून ते आजारी होते. त्यातच गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली ..त्यांच्या पश्चात भाजपाचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव थोरवे हा मुलगा आहे.त्यांच्या मूळगावी सोलापूरवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे,माजी आमदार साहेबराव दरेकर,भीमराव धोंडे,देविदास धस,चंद्रकांत भाऊ आजबे,माजी आमदार जनार्धन तुपे,राजेंद्र जगताप,जयदत्त धस,विजय गोल्हार,बबन महाराज बहिरबाळ,
माऊली कराळे महाराज,शामसुंदर महाराज पुरी,डॉ.शिवाजी शेंडगे,बोडखेप महाराज,आंधळे महाराज,वाळके महाराज,महादेव डोके,रामदास महाराज रक्ताटे ,प्रफ्फुल सहस्रबुद्धे,
तहसीलदार विनोद गुंडमवार,डॉ शिवाजी राऊत,अण्णासाहेब चौधरी,रवींद्र देशमाने, वाल्मीक निकाळजे,भाऊसाहेब लटपटे,मीनाक्षी पांडुळे,रवींद्र ढोबळे,सतीश शिंदे,संपतराव म्हस्के,अशोक साळवे,बाळासाहेब हराळ,
दादासाहेब जगताप,बलभीमराव सुंबरे,किसनराव पवार,आदी सह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

आष्टी तालुक्यातील सालेवडगाव,हातोळण ,गंगादेवी, वाघळुज, खुंटेफळ या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी व त्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे म्हणून लोकमान्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळांची उभारणी केली. सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील उच्चशिक्षित तरुणांना विद्यालयांच्या माध्यमातून कायमस्वरूपी नोकरी मिळवून दिली.
आष्टी तालुक्यातील वारकऱ्यांना पंढरपूर मध्ये वारीला गेल्यानंतर राहण्याची सोय व्हावी म्हणून दादांनी पंढरपूर येथे मठाची उभारणी केली.
सलग 15 वर्ष आष्टी पंचायत समिती सभापती पद भूषवणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणून माननीय थोरवे दादांकडे पाहिले जाते.
फक्त आष्टी तालुक्यातील नव्हे तर पंढरपूर,आळंदी, वृंदावन, हरिद्वार ,काशी विश्वेश्वर येथे सुद्धा असंख्य हरिनाम सप्ताह व त्या सप्ताहातील शेवटची अन्नदानाची पंगत नेहमीच दादांच्यामार्फत दिली जायची.
शिस्त प्रिय प्रशासक कशा प्रकारचा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून दादाकडे पाहिलं जायचं.
सकाळी सात ते आठ वाजताच दादा संस्थेच्या मुख्यालयामध्ये आपले दैनंदिन कामकाज सुरू करत असत.
हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात सहभाग
मराठवाडा मुक्तिसंग्राम आंदोलनामध्ये मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील व इतर सहकार्यांना हाताशी धरून मोगलांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी बीड जिल्ह्यातील, व संपूर्ण मराठवाड्यातील तरुणांना एकत्र आणून गनिमी पद्धतीने हल्ले चढवून दादांनी मोगलांना जेरीस आणले होते.
शेवटी क्रांतिकारकांचा विजय होऊन मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याला यश आले व अखंड हिंदुस्तान मध्ये मराठवाड्याचा समावेश झाला.
आयुष्यभर निर्व्यसनी राहिलेले दादा, वयाचे एकशे दहा वर्षापर्यंत चष्मा न वापरता वाचन करत असत. आदरणीय दादा हे स्वर्गीय मा. मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांचे खास सहकारी म्हणून त्याकाळी ओळखले जात होते.
प्रभू पांडुरंगावर दादांची निस्सीम भक्ती होती. रात्रंदिवस दादांच्या हातामध्ये तुळशीची पवित्र माळ असायची आणि अविरतपणे माळेचा नाम जप चालू असायचा.
काय आहे एसटी त्रिसदस्यीय समितीचा अहवाल?