- Advertisement -
राजूर (शांताराम काळे )

पाणी हे सर्वसामान्य शेतकऱ्यांची सर्वात मोठी गरज असते.
त्यातून आदिवासी पट्ट्यातील डोंगर उतारावरील शेती सांभाळणार्या शेतकऱ्यांकडे
पाण्याची नेहमीच अडचण असते .
पावसाळ्यात धो-धो पडणारा पाऊस डोंगररांगातून दर्या -खोर्यातून वाहून जातो व पुन्हा नशिबी येते पाण्याचे
दुर्भिक्ष .
शेतीसाठी इमेज पाण्याचा मोठा प्रश्न या भागात निर्माण होत असतो तसेच पिण्याच्या पाण्याचा व जनावरांसाठी
लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होत डोंगराळ भागांमध्ये वस्ती करून राहणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना या
समस्येला नेहमीच तोंड द्यावे लागते.या सर्व समस्यांवर मार्ग काढण्यासाठी बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त
संस्थेच्या माध्यमाने जुने बंधारे दुरुस्ती व त्यातील गाळ काढणे या कामांना गती देण्यात आलेली आहे. आदिवासी
पट्ट्यामध्ये विविध विकास यंत्रणांकडून मोठा निधी खर्चून पक्के बंधारे , मातीचे बंधारे , नाला बिल्डिंग, यांची
उभारणी करून पाणी अडवण्यासाठी प्रयत्न केले गेले . यापैकी बरेच स्ट्रक्चर दुरुस्तीअभावी गळती लागल्याने
कुचकामी ठरत होते. यावर मार्ग काढण्यासाठी बायफ संस्थेने नाबार्ड पुरस्कृत हवामानबदल कार्यक्रम व जनरल
मिल्स पुरस्कृत आदिवासी विकास कार्यक्रम यांच्या माध्यमाने मान्हेरे , लाडगाव , टिटवी , पिंपरकणे , डोंगरवाडी ,
कोदणी या आदिवासी पट्ट्यातील गावांमध्ये बंधारे दुरुस्ती आणि गाळ काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे . चालू
हंगामात सुमारे पाच बंधारे दुरुस्त करून आणि गळती थांबवण्यात आली आहे . बंधाऱ्यातील गाळ काढून साठवण
क्षमता वाढविण्यात आली आहे. या कामांमुळे सुमारे 15 ते 20 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.येणाऱ्या
पावसाळी हंगामापूर्वी ही कामे पूर्ण करण्यात आल्यामुळे मोठा पाणी साठा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. या
पाणीसाठ्याचा उपयोग करून खरीप , रब्बी आणि काही प्रमाणात उन्हाळी हंगामात आहे पिके घेता येणे शक्य
होणार आहे. तसेच जनावरांसाठी हिरवा चारा ही उपलब्ध होणार आहे.या कामांमुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त
करण्यात आला आहे. खरीप हंगामातील पिकांना आवश्यकता भासल्यास याच बंधाऱ्यातून पाणी देता येणार आहे.
तसेच रब्बी हंगामातील गहू ,हरभरा ,वाल इत्यादी पिके खात्रीशीरपणे घेता येणार आहेत. याशिवाय विविध प्रकारची
भाजीपाला पिके यामध्ये कांदा ,बटाटा, लसुन टोमॅटो, वांगी ,मिरची ,यांचे उत्पादनही या भागातून वाढण्यास मदत
होणार आहे. या कामांना गती देण्यासाठी विषय तज्ञ श्री शशिकांत मेहेत्रे ,जलतज्ञ रामनाथ नवले तसेच फिल्ड वरील
स्टाफ रोहिदास भरीतकर ,शुभम नवले, राम कोतवाल, लीला कुऱ्हे यांनी भरीव मदत केली आहे. येत्या काळात
विविध विकास यंत्रणांच्या माध्यमातून जुने बंधारे दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले जाईल असे
प्रतिपादन बायफ विभागीय अधिकारी जीतीन साठे यांनी केले.
- Advertisement -