- Advertisement -
- Advertisement -
कोरोनाच्या संकटाने मोडला गं बाई संसाराचा कणा…
मदतीचा हात देऊन मायबाप सरकार नुसते लढं म्हणा…
कोतूळ (वार्ताहर)…आपल्या भारत देशात अजूनही कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेने मृत्यूचे तांडव सूरु आहे.कोरोनाच्या या संकटांत जगाचा पोशिंदा,हातावर पोटं असणारे छोटे व्यापारी,भाजीपाला विकणारे(तरकारी) चा धंदा करणारे,फिरता वैदू समाज यांच्या संसारुपी आयुष्याचा कणा मोडला आहे…मदत देता का हो कोणी ! अशी काळजाला पाझर फुटणारी मदतीची आर्त हाक आहे कोतूळ येथील मातंगसमाजातील भूमिहीन , निरक्षर सौ.भिमाबाई नारायण खरात या ७० वर्षीय माऊलीने वर्षभर भाजीपाला विकून कोरोना संकटांत पांढरपेशा नोकरदारांना,कोरोना बाधित राग्णांना ताजा भाजीपाला अल्प दरात विकून सकस चौरस आहारास मदत करून अल्प मिळकतीत संसाराचा गाडा ओढणा-या त्या मायबाप जनतेसाठी कोरोना योद्धा आहेत.सरकारने सामाजिक बांधिलकी जपणा-या आणि कोरोनाच्या महाभयंकर संकटात जनसेवा करणाऱ्या दारिद्रय यादीत नाव असणाऱ्या छोट्या बाराबलुतेदार , लघु उद्योग ,किराणा व्यावसायिक ,दारोदार भाजीपाला विकणारे फेरीवाले,भटका वैदू समाज,दिव्यांग व्यावसायिक ,तमाशा कलावंत ,ऊसतोडणी मजूर,मेंढपाळ, आणि देहविक्रय करणाऱ्या वारांगणा ,या वंचित आणि उपेक्षित समाजाला म्हणजे झूलवाकार प्रसिद्ध लेखक उत्तम बंडू तूपे यांच्या भाषेत सांगायचे असल्यास “काट्यांवरच्या पोटांसाठी ” शून्ये टक्के व्याजदराने ३०. हजार कर्जरुपी मदत मायबाप सरकारने ,स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आमदार निधीतून देऊन,किराणा वाण साहित्य ,भाजीपाला यांचा १४४ कलम काळात अत्यावश्यक सेवा यात समावेश करावा.तरचं आमची चिली पिल्ली आणि आम्ही जिवंत राहू..हे आमच्या प्रतिनिधीस सांगताना निरक्षर वृद्ध माऊली भिमाबाई नारायण खरात यांच्या डोळ्यांत पाणी दाटून आले.
……कोरोना या संकटांत या देशातील प्रत्येक नागरीक सैनिक म्हणून लढत आहे.या सर्व शहीद झालेल्या आणि जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या ज्ञात आणि अज्ञात कोरोना योद्धा यांना दैनिक युवा ध्येय परिवाराच्या वतीने वंदन.सैन्य हे भाकरीवर लढते.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात,ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती शेतकरी,कामगार ,कष्टकरी यांच्या तळहातांवर तरलेली आहे.कोरोना या संकटांने मृत्यूचा आलेख वाढला आहे.यात घरातील कर्ते पुरुष,युवा वर्ग ,छोटे व्यावसायिक यांचा समावेश आहे.कारखान्यांचे नव निर्मितीचे चाक आणि कारखान्यांचे धुराडे यांचा श्वास बंद पडला आहे.पुरवठा कमी आणि मागणी जास्त हा अर्थव्यवस्थेचा पाया असलेला वाळवी लागल्याने पोखरला गेला आहे. .परिणामी अर्थव्यवस्थेला खिळ बसली आहे.अशावेळी अराजकता आणि आणीबाणीजन्य परिस्थिती निर्माण होऊन गुन्हेगारी,काळे गोरख धंदे,औषधांचा काळाबाजार,जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी,जुन्या दराने कमी किंमतीत खरेदी केलेल्या वस्तु किंमतीचा लेबल बदलून दुप्पट दराने विक्री करुन ग्राहकाला लुटले जाते.,ग्राहकांच्या खिशाला अलगद काञी लावली जाते,खतांचा आणि जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार होऊन महागाईचा आगडोंब उसळला जातो,रेशनचोर,कोंबडीचोर ,साठाबाजी करणारे दलाल आणि राजकीय संधिसाधू यांचे पीक जोमात येऊन जनता कोमात जाते.परिणामी महागाई निर्देशांक कमी होऊन दरडोई कर्ज वाढते.अशा या दृष्टचाकात सर्वसामान्य माणूस ऊसासारखा पिळला जातो.अशा वेळी सर्व स्तरावरील माणसाला मदत देणे,आधार देणे संघशासन आणि राज्यशासन यांचे कुटुंब प्रमुख या नात्याने मदत करणे हे कर्तव्य आहे.सरकारच्या विश्वासाला तडा गेला की अराजकता माजून भूकेचा आगडोंब उसळून येऊन रक्तरंजित क्रांतीची बीजे या समतेच्या आणि आदर्शवादी लोकशाहीच्या मातीत भविष्यात अकारण पेरली जाऊ शकतात.सरकारने मदत करताना कोणताही भेदभाव न करता मानवता आणि माणूस याचे नाते जपत तळातल्या सर्वच घटकांना मदत केली पाहीजे.केवळ आश्वासन आणि घोषणांची खैरात करुन कोरोनाच्या आगीत होरपळून जीव वाचलेल्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये.कोरोना संकटांत संघशासनाने प्रधानमंञी किसान योजना यातून शेतकरी यांस नुकतीच मदत केली आहे.दोन्ही सरकारने नोकरदार यांच्या पगाराला काञी न लावता १00%वेतन नियमितपणे अदा केले.आहे.शेतकरी या घटकांस मदत केली आहे. कोरोना या संकटाची तीव्रता आणि निसर्गाची अवकृपा यामुळे बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास अतिवृष्टी,गारपीटाच्या संकटाने हिरावून घेतला आहे.मिळणारी मदत म्हणजे “राजा उदार झाला अन् बळीराजाच्या हाती भोपळा दिला “.पण या देशात कारखाना कामगार ,छोटे व्यावसायिक ,भाजीपाला विकणारे,छोटे हॉटेल व्यावसायिक ,तमाशा कलावंत,भटका समाज,मेंढपाळ ,ऊसतोडणी कामगार यांचे जगणं ,वेदना शब्दांत मांडणे अवघड झाले आहे.कवी नारायण सुर्वे म्हणतात भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली..कोरोनाच्या लाटेत आई बायको गेली..मी जगलो कसा..जिंदगी शापित झाली.सरकारने शेतकरी,मजूर ,कष्टकरी आणि लघु ऊद्योग , भाजीपाला आणि किराणा दुकानदारआणि बाराबलुतेदार-अलुतेदार यांना बिनव्याजी कर्ज मुद्रालोन या योजनेतून दिले पाहिजे.पगारदार यांना दिलेली पगाररुपी मदत योग्य आहेत .ते कोरोनायोद्धे आहेत..एकाच घटकाला भरपूर जेवण आणि दुसऱ्याला उपाशी जाणीवपूर्वक उपाशी ठेवणे .यामुळे कवी वामनदादा कर्डक म्हणतात …लोणी सारचं तिकड पळं…
………..इकडं भुकेने जिवडां जळं
………..तिकडं लुगडं लुगड्यावरं
………..इकडं संसार उघड्यावरं
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.शेतकरी सुखी…तर जगं सुखी..शेतकरी आणि कृषी योजनांना भरीव मदत मिळाली पाहीजे.कारण शेतकरी भूमिपूञ सत्तेत आहेत.कवी डॉ.इंद्रजित भालेराव म्हणतात…माझ्या बापाने नाही केला रे पेरा!! तू काय खाशील रे धतुरा !! बघू या मदतीसाठी सरकारकडे आशेने डोळे लावून बसलेल्या संकटांने हतबल झालेल्या आणि जीवंतपणी मरणाची वाट पाहणाऱ्यांना माय बाप सरकार द्या हो मदतीचा हात…माणुसकीचा हात..!!
अतिवृष्टी च्या अनुदान मिळावे यासाठी रस्ता रोकोbio disel,
बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश