मुंबई
कल्याण-डोंबिवली येथे ओमिक्रॉन प्रकाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आढळला प्रयोग शाळेत तपासणीतून ओमिक्रॉन प्रकाराच्या उपस्थितीची पुष्टी झाली आहे.हा युवक ३३ वर्षाचा आहे.
24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून हा प्रवासी मुंबईत आला.
दुबई आणि दिल्ली मार्गे हा प्रवासी प्रवास करून आला. राज्यातील ओमिक्रॉन प्रकाराचा पहिला रुग्ण आहे.
हा तरुण प्रवासी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा रहिवासी असून
त्याने कोणतीही कोविड-19 लस घेतली नाही. २४ नोव्हेंबर रोजी प्रवाशाला सौम्य ताप आला. तथापि, इतर लक्षणे दिसून आली नाही.
या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णावर कोविडमध्ये उपचार केले जात आहेत.सध्या या रुग्णांवर कल्याण-डोंबिवलीतील केअर सेंटर उपचार सुरु आहेत.
प्रवाशांच्या उच्च-जोखीम असलेल्या संपर्कांपैकी 12 आणि कमी-जोखीम असलेल्या संपर्कांपैकी 23 संपर्क शोधण्यात आले आहेत.आणि सर्वांची कोविड-19 चाचणी निगेटिव्ह आली आहे.
याव्यतिरिक्त, दिल्ली-मुंबई विमानाच्या सहप्रवाशांपैकी 25 जनांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सध्या आणखी संपर्क सुरू आहेत.
ATM फोडणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
दरम्यान, 60 वर्षीय पुरुष जो झांबियाहून आला होता या प्रवाशाच्या नमुन्याच्या जीनोमिक सिक्वेन्सिंगचे परिणाम
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजीमधून प्राप्त झाले आहे. त्याच्या नमुन्यात ओमिक्रॉन आढळले नसून त्याऐवजी, डेल्टा प्रकाराचा उप-वंश सापडला आहे.
आज सकाळपर्यंत, मुंबई विमानतळावर ओमिक्रॉनसाठी 3,839 प्रवासी जोखीम असलेल्या देशांमधून आले आहेत.
इतर देशांमधून आलेल्या 17,107 प्रवाशांपैकी 344 RT-PCR द्वारे चाचणी केली गेली आहे .
बीड जिल्ह्यातील 11 कुटुंबियांना मिळणार 10 लाख
1 डिसेंबर 2021 पासून, 8 प्रवाशांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांचे नमुने
जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहे.
ओमिक्रॉन राज्यात आला
सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी कोविडचे पालन करावे.
गेल्या महिन्यातील आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास असलेल्या नागरिकांची माहिती आरोग्य विभागाला कळवावी. ज्यांनी कोविड-19 ची लस घेतलेली नाही.
किंवा फक्त एकच डोस घेतला असेल त्यांनी त्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे.