ताज्या बातम्या

श्रद्धेने 80 म्हशींचा सांभाळ करणारी युवती ;श्रद्धा ढवण

By admin

March 07, 2021

 

 

महिला दिन विशेष

श्रद्धा ढवण चुकलात ना .. ही माय नाही युवती आहे.पण ती एक नव्हे तर  चक्क 80 म्हशींचा सांभाळ करतेय,म्हणजे झालीच न माय.निघोज मधील श्रद्धा सतीश  ढवण हे तिचे नाव.

 

जोडधंदा करण्यात महिला नेहमी माहीर असतात. शेती म्हटलं कि जोडधंदा आलाच.जोडधंदा केला तरच शेती फायद्यात पडते.असं समीकरण सध्या बनत चाललय.म्हशी पालनाचा पूरक व्यवसाय करणारी युवती सध्या समाज माध्यमांवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जागतिक महिला दिन (world women’s day ) निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथील श्रद्धा सतीश ढवण हिच्या म्हशी पालनाची यशोगाथा.

 

कष्ट करणे हे तिच्या रक्तातच असते.मात्र तिच्या कष्टाचे घरातून  कौतुक केले तर तिला प्रोत्साहन मिळते.असेच प्रोत्साहन श्रद्धाला मिळाले आणि आज लाखो रुपयांचा दुधाचा व्यवसाय श्रद्धा करतेय.

आणखी वाचा:महिला दिन विशेष; योगक्षेम वहाम्यःमच्या माध्यामतून आकाशाला गवसणी घालणाऱ्या अलका पवार 

आज श्रद्धा ढवण च्या घरी 80 म्हशी आहेत. सुरुवातीला पाच सहा म्हशींचा सांभाळ करता करता ती 80 म्हशींची माय बनली.शेती सह म्हशींचा व्यापार करण्याचा वडिलांचा धंदा.त्यातही ते दिव्यांग .घरात थोरली असलेली श्रद्धा वडिलांच्या सोबतीने म्हशींचा सांभाळ करायला लागली. इयत्ता 11 मध्ये असताना सकाळी उठून चारा आणायचा, दूध काढायचं, डेअरीला घालायचं, अशी कामं ती करायची. तिचे हे कामे आजही न थकता सुरु आहेत. (world women’s day )ती मोटारसायकलवरून दूध तर घालतेच पण चारचाकी वाहनही हाकत जनावरांना बाजारातून चारा आणते.यावर तिचा प्रवास थांबत नाही तर आपल्या अभ्यासाकडे पण लक्ष देते. श्रद्धा सध्या एम एस्सी करतेय तिला भविष्यात शेंद्रीय शेती करत स्वतःचे उत्पादन सुरु करायचेय.

याबाबत श्रद्धाने सांगितले कि, “मला या कामाची लाज वाटत नाही, उलट लोकं माझं कौतुक करतात, आमच्या शेजारी असणारे प्रगतशील शेतकरी नेहमी मला दुध घालायला येताना पाहायचे. त्यांनी माझी माहिती न्यूज प्रतिनिधीला दिली आणि माझी माहिती जगासमोर आली”

श्रद्धा ढवण world women’s day

श्रद्धा 11 वी पासून या कामात आहे. साधारणतः महिला ह्या काम करतात. पण त्यांना आर्थिक कामात सहभागी करून घेतले जात नाही मात्र श्रद्धा ढवण च्या वडिलांनी तिच्यावर विश्वास टाकल्याने आज ती संपूर्ण म्हशींचा कारभार सांभाळते.

श्रद्धा ढवण चे वडील दिव्यांग, लहान बहीण अश्विनी पुण्यात शिक्षण घेते. लहान भाऊ कार्तिक अकरावीत शिकत आहे. त्यामुळे कुटुंबाचा सगळा भार श्रद्धा आणि तिच्या आईवर आहे. वडिलांनी तिला लहानपणी कुस्तीचे प्रशिक्षण दिलं. पुढे जाऊन ती ज्युदोपटू बनली. दहावीत असतानाच ती दूध काढायला शिकली.

घरी असलेल्या चार म्हशींचा सुरुवातीला श्रद्धा ढवण ने व्यवस्थापन केलं. हळूहळू तब्बल ऐंशी म्हशींपर्यंत पोहचली आहे. या म्हशींसाठी तिने वडिलांच्या मदतीने घराजवळच म्हशींसाठी दोन मजली गोठा बांधलाय. मजुरांच्या मदतीने ती दुग्धव्यवसाय करते.पावसाळ्यात जनावरांना कोरडा चारा हवा असतो. गवताबरोबर त्यांना सकस चारा मिळावा यासाठी तिने मुरघास तयार केला आहे. वड्निरे रस्त्यावर निघोज गावापासून काही अंतरावर श्रद्धा हिचे गोठा नजरेस पडतो. गोठ्याच्या समोरच मुरघास ने भरलेले मोठे भोत नजरेस पडतात.तर बाजूला मोठे शेणाचा ठीग दिसतो आणि हा श्रद्धाचा गोठा असावा असे लगेच लक्षात येते.

 

स्वतःचे शिक्षण करून घराला हातभार लावत असल्याने आईलाही श्रद्धा ढवण चा अभिमान आहे. गावातील लोकही तिचं कौतुक करतात.  वडीलही म्हणतात ही माझी मुलगी नाही तर मुलगाच आहे.सुट्टीत आल्यावर तिची भावंडंही श्रद्धाला मदत करतात. कोणताही न्यूनगंड न बाळगता ती काम करते आहे, असं दिसल्यावर नावं ठेवणाऱ्या मैत्रिणीही तिचं कौतुक करतात.

अनेक जण आपल्या व्यवसायाच्या वाटा निवडताना शेतीला दुय्यम स्थान देतात.तर जनावरे सांभाळणे हे लज्जास्पद वाटते मात्र श्रद्धाचे मत यापेक्षा भिन्न आहे ती म्हणते कि, “आपण केलेले कोणतेही काम व्यवसायच  आहे,” असे ती म्हणते. जागतिक महिला दिनाच्या (world women’s day ) निमित्ताने तिचा गौरव व्हायला हवा.