World Athletics Championships 2022

ताज्या बातम्या

World Athletics Championships 2022 :अविनाश साबळे फायनल मध्ये

By admin

July 16, 2022

 

 

 

बीड

अमेरिकेत सुरू असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (World Athletics Championships 2022  )  या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळे (Avinash Sable)  याने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील 27 वर्षीय अविनाश साबळे याने 3 हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये ( Steeplechase ) फायनल गाठली आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या अविनाशने 8 मिनिटं आणि 18.75 सेकंद वेळ घेत तिसरा क्रमांक पटकावत अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीमध्येही त्याने याच पद्धतीची सर्वोत्तम कामगिरी केल्यास तो पदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करू शकतो. अविनाश सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असल्याने पदकाची अपेक्षा उंचावल्या आहेत. ( world athletics day )

World Athletics Championships 2022

27 वर्षांचा अविनाश ने यासाठी जोमात सराव केला आहे. या स्पर्धेसाठी काही महिन्यापासून तो अमेरिकेत सराव करत होता.  सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यानं जून महिन्यात झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत 8 मिनिट 12.48 सेकंद वेळ घेत स्वत:चाच रेकॉर्ड तोडला होता. यापूर्वी त्यानं 8 मिनिटे 16 सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी केली होती. अविनाशनं तब्बल 4 सेकंद कमी वेळ घेत नवा रेकॉर्ड केला होता. यावेळी त्यानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेल्या खेळाडूला देखील मागे टाकले होते.

mns news मनसे च्या तक्रारीनंतर नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल महिन्यानंतरही येईना

सन जुआन कॅपिस्त्रोनो येथे झालेल्या स्पर्धेत त्याने 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील बहादूर प्रसाद याचे 1992 सालचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने हे अंतर अवघ्या 13:25:65 इतक्या वेळेत पूर्ण केले. यापूर्वीचा विक्रम हा बहादूर प्रसाद यांच्या नावावर होता. त्यांनी हे अंतर 13:29:70 इतक्या वेळात पूर्ण केले होते.

 

अविनाश याने गेल्या वर्षी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे स्टीपल चेस या अडथळ्यांच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. देशात अविनाश ने  ( sable wrestler )

धावण्याच्या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले आहेत.

मुळचा बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे हा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन आर्मी मध्ये भरती झाला. तेथून पुढे त्याचा धावण्याच्या स्पर्धेतील प्रवास सुरु झाला. त्यापूर्वी त्याने शालेय स्थरावर आणि कनिष्ट महाविद्यालायिन स्थरावर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.