ताज्या बातम्या

राज्य शिक्षक पुरस्कारात बीड जिल्ह्यात महिलांची बाजी

By admin

September 02, 2024

मनोज सातपुते

राज्य सरकारच्या वतीने दिले जाणारे राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झाले . या पुरस्कारामध्ये बीड जिल्ह्यातील दोन पुरस्कारामध्ये महिला शिक्षिकांनी बाजी मारली आहे.

राज्यातील 110 राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा आज शासनाच्या वतीने करण्यात आली. यामध्ये प्राथमिक विभागातील 39 माध्यमिक विभागातील 39 आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक 19 थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार 8 विशेष शिक्षक कला क्रीडा दोन दिव्यांग शिक्षक एक आणि स्काऊट गाईड शिक्षक दोन अशा एकूण 110 पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली .

बीड जिल्ह्यातील माध्यमिक आणि प्राथमिक हे दोन्ही पुरस्कार महिलांनी मिळवले आहेत प्राथमिक विभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मल्लनाथपूर केंद्र मोहा तालुका परळी येथील जया किसन इगे यांना जाहीर झाला आहे तर माध्यमिक विभागातून जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चौसाळा येथील पद्मजा शरदराव हंपे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.