बीड
Will Pankaja Munde become a minister? भाजपच्या महासचिव असलेल्या माजी मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांना राज्यसभेवर खासदार म्हणून घेणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या राज्य सभेवर अनेक जागा रिकाम्या आहेत. त्यांची मुदत पूर्ण झाल्याने आणि त्या खासदारांनी लोकसभा लढविल्याने त्यांच्या जागा रिकाम्या झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी पंकजा यांना राज्यसभेवर घेऊन पुनर्वसन करणार का ? असे सध्या बोलले जात आहे.
पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाल्याने, आता त्यांच्याकडे पक्षाचे पद सोडता इतर कोणतेही पद नाही. राज्याच्या राजकारणात त्यांची पक्षाला गरज पाहता त्याचे पुनर्वसन होणार असल्याचे चित्र आहे.
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेतल्यास त्यांना मंत्री पद मिळण्याची दाट शक्यता असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यांच्या भगिनी डॉ प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पक्षाने पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली. अशातच त्यांचा पराभव झाल्याने त्यांचे पुर्नवसन होणार असल्याचे कळते.
त्यासाठी त्या तातडीने दिल्ली येथे रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील तिसऱ्या सरकारच्या कॅबिनेटमध्ये पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभेवर पंकजांचं राजकीय पुनर्वसन करुन त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतलं जाण्याचे संकेत मिळत आहेत.लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या पियुष गोयल, उदयनराजे भोसले, नारायण राणे यासारख्या उमेदवारांच्या राज्यसभा जागा रिक्त होणार आहेत. पंकजा मुंडेंना राज्यसभा देऊन मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. एनडीएच्या बैठकीचं दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी पंकजांबाबतीत मोठी घडामोड समोर येणं अपेक्षित आहे.