नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे.
समृध्दी द्रुतगती मार्गाचा डिझाइन स्पीड १५० कि.मी. / प्रति तास आहे. या द्रुतगती मार्गावरून १०० कि.मी. / प्रतितास वेगाने वाहने गेल्यावर मुंबईपासून शिर्डी येण्यास अवघे दोन तास लागतील.
राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे,
• लांबी ७०१ किमी • एकूण जमीन : ८३११ हेक्टर • रुंदी : १२० मीटर • इंटरवेज : २४ • अंडरपासेस : ७०० • उड्डाणपूल : ६५
• लहान पूल : २९४ • वे साईड अमॅनेटीझ : ३२ • रेल्वे ओव्हरब्रीज : ८ • द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड)
• द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष • कृषी समृद्धी केंद्रे : १८ एकूण गावांची संख्या : ३९२
प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये • एकूण लाभार्थी : २३ हजार ५०० • वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये •
• द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत • ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे.