शिर्डी येथे साईबाबांच्या  104 व्या तीन दिवसीय पुण्‍यतिथी उत्सवास प्रारंभ 

.श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. 

 जिल्हाधिकारी डॉ  .राजेंद्र भोसले यांनी विणा,
मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी पोथी
ले.कर्नल डॉ.शैलेश ओक व सामान्‍य प्रशासन प्र.अधिक्षक नवनाथ कोते यांनी प्रतिमा घेवुन सहभाग घेतला.

प्रथम व व्दितिय अध्यायाचे वाचन  संस्थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले

समाधी मंदिरात तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.दिपाली भोसले यांच्‍या हस्‍ते श्रींची पाद्यपूजा करण्‍यात आली.

व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने  आकर्षक विद्युत रोषणाई 

श्री साईबाबांनी १०३ वर्षांपुर्वी दस-याच्‍या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्‍या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. 

Stay Updated with latest news