.श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ .राजेंद्र भोसले यांनी विणा, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी पोथी ले.कर्नल डॉ.शैलेश ओक व सामान्य प्रशासन प्र.अधिक्षक नवनाथ कोते यांनी प्रतिमा घेवुन सहभाग घेतला.
प्रथम व व्दितिय अध्यायाचे वाचन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले
समाधी मंदिरात तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व त्यांची सुविद्य पत्नी सौ.दिपाली भोसले यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली.
व्दारकामाई मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई
श्री साईबाबांनी १०३ वर्षांपुर्वी दस-याच्या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली.