Village ban on leaders in Hatola village for protection of OBC reservation

ताज्या बातम्या

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी हातोला गावात पुढाऱ्यांना गावबंदी

By admin

June 21, 2024

आष्टी,

Village ban on leaders in Hatola village for protection of OBC reservation मराठा आंदोलनाच्या पाठोपाठ ओबीसी संरक्षणाची लढाई लढली जात आहे. यासाठी जालना येथे लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरु केले आहे. त्याला पाठींबा म्हणून आष्टी तालुक्यातील हातोला येथे संपूर्ण गावाने आंदोलन उभा केले आहे.

त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी केली आहे. राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचे बॅनर गावात लागले असून महाराष्ट्रातील गावबंदी करणारे  हातोला हे पहिले गाव ठरले आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हातोला येथे ओबीसी समाज बांधव यांचे तब्बल चार दिवसा पासून उपोषण सुरू असून हातोला येथे ओबीसी समाज बांधव यांच्या वतीने ओबीसी आरक्षणाचे संरक्षण होईपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी करण्यात आली आहे.यावेळी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप हे आंदोलनात सहभागी झाले आहेत..