शासनाचे अनुदान लाटणा-या बोगस वाचनालयांवर फौजदारी कारवाईसाठी ” वाचन चळवळ वाचवा “आंदोलन
beed
vachanalaya agitation in beed बीड जिल्ह्य़ातील एकूण ६६६ अनुदानित ग्र॔थालयापैकी ७० टक्केच्यावर ग्रंथालये केवळ कागदोपत्रीच सुरू असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संगनमतानेच शासकीय अनुदान लाटण्यात येऊन शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक होत असून जिल्ह्याबाहेरील यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून अनुदानित रक्कम वसुल करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली.
यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२० फेब्रुवारी सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी ” वाचन चळवळ वाचवा ” granthalaya आंदोलन करण्यात येऊन संतोष राऊत निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री ,प्रधान सचिव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनात रामनाथ खोड, राहुल कवठेकर, शेख युनुस च-हाटकर,हमीदखान पठाण, मिलिंद सरपते,बलभीम उबाळे, सय्यद आबेद, मुबीन शेख, मुश्ताक शेख,भिमराव कुटे, अड.राज पाटील लढा दुष्काळाशी फाऊंडेशन बीड, भिमराव कुटे तालुकाध्यक्ष आप, दत्तात्रय सुरवसे तालुका संघटक आप,रंजीत सुरवसे, आदि सहभागी होते.
वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी, थोर पुरूषांचे चरीत्र, कथा, कादंब-या आणि नियमित घडामोडींची माहिती मिळावी यासाठी नियतकालिके स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध व्हावीत यासाठी शासनाकडून सार्वजनिक ग्रंथालये चालविली जातात. जिल्ह्यात तब्बल ६६६ अनुदानित ग्रंथालये आहेत यापैकी काही वाचनालये चांगल्या पद्धतीने सुरू आहेत मात्र ६० टक्क्यांच्या पेक्षा जास्त ग्रंथालये आणि वाचन चळवळ कागदावर आणि अनुदान चालकांच्या खिशात असाच प्रकार सुरू असून कागदोपत्रीच व फलकापुरतीच वाचनालये आस्तित्वात असुन जिल्हा ग्रंथालय आधिकारी आणि बोगस वाचलनालय चालक चालक संगनमतानेच नियमित तपासणी केल्याचा बोगस अहवाल देऊन अनुदान लाटतात कागदपत्रात वाचनालय चालकांचा एखादा नातेवाईक ग्रंथपाल म्हणून नियुक्त केल्याचे दाखवले जाते व आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठीच कार्यालयात बसुन तपासणीचा फार्स केला जातो.
बीड जिल्ह्य़ात वर्गवारीनिहाय अ वर्ग ८ ,ब वर्ग १७३, क वर्ग १७८ आणि ड वर्ग ३०७ अशी एकूण ६६६ अनुदानित वाचनालये आहेत. या वर्गवारीनुसार साडे सात लाख रूपयांपासुन ३० हजार रूपयांपर्यंत वार्षिक अनुदान दिले जाते.तालुक्यातील ग्रंथालयांना वर्गनिहाय अ वर्ग ३ लाख ८४ हजार, ब वर्ग २ लाख ८८ हजार, क वर्ग १ लाख ४४ हजार तर ड वर्ग ३० हजार रूपये अनुदान मिळते.
नियमांची ऐशीतैशी;कागदोपत्रीच पुर्तता
तपासणीसाठी आलेले आधिकारी आर्थिक हितसंबंध जोपासत मॅनेज केले जातात. नियमानुसार १७ रजिस्टर मेंटेन करावे लागतात तसेच मिळणा-या अनुदानातुन २५ टक्के रकमेची पुस्तके खरेदी करणे बंधनकारक असतात मात्र कागदोपत्रीच नियमांची पुर्तता केली जाते.
मराठी पत्रकारीतेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर” यांना जयंतीनिमित्त अभिवादन ___ . वाचन चळवळ वाचवा आंदोलन सुरू करण्यापुर्वी प्रथम मराठी पत्रकारीतेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या २११ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदोलकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.