ताज्या बातम्या

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतले सहकुटुंब संत गजानन महाराजांचे दर्शन

By admin

June 18, 2024

बुलडाणा

Union Minister of State for Sports and Youth Welfare Raksha Khadse took darshan of Sahakutumba Sant Gajanan Maharaj केंद्रीय राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर रक्षा खडसे ह्या विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी काल 17 जुनला आल्या होत्या .

त्यांच्यासोबत त्यांचे सासरे एकनाथ खडसे आणि सासूबाई ही सोबत होत्या संत गजाननाचे दर्शन घेतल्यानंतर रक्षा खडसे म्हणाल्या की लवकरच त्या दिल्लीला पोहोचून कामकाजाला सुरुवात करणार आहेत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळाल्याचेही त्यांनी म्हटले आहे क्रीडा क्षेत्रात युवकांसाठी भरीव काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं सोबतच एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरच त्याला यश मिळेल असे रक्षा खडसे म्हणाल्या.