Three jawans died after SDRF boat overturned in Pravara river

प्रादेशिक वृत्त

प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटून तीन जवानांसह सहा मृत्यू

By admin

May 23, 2024

Three jawans died after SDRF boat overturned in Pravara river जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटण्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे. प्रवरा नदीत काल दोन तरुण बुडाले असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता. या शोधकार्यादरम्यान एसडीआरएफची बोट उलटली आणि तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला.एकूण मृतांचा आकडा 6 झाला आहे.

प्रवरा नदी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. उकाड्याने त्रस्त झालेले अनेकजन या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जात आहेत. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सुगाव मधील रोपवाटीके जवळील पात्रात दोन युवक पोहण्यासाठी प्रवरा नदीत उतरले होते. यावेळी पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने पोपट जेडगुले (वय २५), अर्जून रामदास जेडगुले (वय १८) या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

त्यांना वाचविण्यासाठी धुळे येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकातील जवणांची तुकडी बचाव कार्यासाठी रवाना करण्यात आली होती. नगर जिल्ह्यात प्रवरा नदीत बचाव कार्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. पाण्याच्या भोवर्यात बोट अडकून उलटल्याने धुळे एसडीआरएफ पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे रा. दौड, राहुल गोपिंचद पावरा रा. शिरपूर आणि वैभव सुनिल वाघ रा.भडगाव हे तीन जवान जखमी झाले त्यांना उपचारासाठी हरिचंद्र बानकुळे हॉस्पिटल अकोले येथे उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.