There is no shortcut to success effort is the mantra of success

ताज्या बातम्या

यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो प्रमाणिकपणे प्रयत्न हाच यशाचा कानमंत्र – सुरेश महाराज जाधव 

By admin

June 17, 2024

बीड

There is no shortcut to success effort is the mantra of success उंच ध्येय गाठण्यासाठी मोठी स्वप्न पहा आणि जितोड मेहनत करा. यश मिळवण्यासाठी उत्तम मार्गदर्शक आणि कठीण परिश्रम मेहनत आवश्यक असते. असे प्रतिपादन श्री ह भ प प्रा.नाना महाराज कदम यांनी केले. बीड तालुक्यातील आंबिलवडगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती माझी न्यायमूर्ती बिपिन मंत्री ,ज्येष्ठ विधीज्ञ मनोहर तांदळे, कृषी विद्यापीठ परभणीचे शास्त्रज्ञ डॉ संदीप पायाळ, सुरेश महाराज जाधव,  सरपंचपती चंद्रसेन कीलमिसे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रसाळ सर, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र खेडकर यांच्या सह सर्व शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती.

बीड तालुक्यातील आंबिलवडगाव येथे कै. अण्णासाहेब तांदळे शिक्षक प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या  गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.. शाळेचा निकाल १०० टक्के लागला. शाळेचा व गावकऱ्यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये कु. वैष्णवी तांदळे -९१% प्रथम क्रमांक, सानिया भालेराव-९० %द्वितीय , प्रगती गंगावणे-89% तृतीय  क्रमांक मिळवले. 

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुरेश महाराज जाधव म्हणाले की यश मिळवत असताना कुठलाही यशाला शॉर्टकट नसतो. प्रमाणिकपणे प्रयत्न हाच यशाचा कानमंत्र आहे.  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नाना महाराज म्हणाले की उंच ध्येय गाठण्यासाठी मोठी स्वप्न पहा आणि जी तोड मेहनत करा ज्यामधून यश मिळेल.. जोपर्यंत अभ्यासातून स्वतःची प्रतिष्ठा ओळख निर्माण होत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडू नका असे मनोहर तांदळे म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी संघर्षाची क्षमता असते असं संदीप पायाळ म्हणाले… या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेंद्र खेडकर यांनी केले तर सूत्रसंचालन लक्ष्मण पायाळ यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंदांनी सहकार्य केले..