The path to school goes through the mud

शिक्षण

चिखलातून जाते ही शाळेची वाट

By admin

June 16, 2024

बीड

The path to school goes through the mud जिल्ह्यातील सर्व शाळा आज दि.१५ जुन पासुन सुरु झाल्या आहेत.शाळेचा प्रारंभ हा चैतन्यमय व उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळावी यासाठी यासाठी शाळेमध्ये नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागाकडून मिठाई, पुष्पगुच्छ वाटपासह विविध उपक्रमांचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

मात्र बीड तालुक्यातील कामखेडा गावातील शिंदेवस्तीवरील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी चिखल तुडवीत शाळेत जावे लागत आहे. कामखेडा गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील जवळपास ५० लोकसंख्या असलेल्या ग्रामस्थांनी रस्ता मिळावा यासाठी २-३ वर्षांपासून जिल्हा प्रशासन दरबारी निवेदने देऊन सुद्धा अद्याप कोणतीही उपाययोजना न केल्याने एकंदरीतच शिक्षणाची केवळ कोट्यवधींचा खर्च करून जाहिरात बाजी करणा-या जिल्हा प्रशासनाला याचे गांभीर्य नसुन संबंधित प्रकरणात विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करून रस्त्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पावसाळ्यात शेतातील कामं सोडून मुलांना शाळेपर्यंत सोडायला यावं लागतं :- स्वाती शिंदे (पालक)

 दरवर्षी पावसाळ्यात पाणंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साठते.जास्त पाऊस झाल्यास मुलांना शाळा बुडवावी लागते. पाण्यामुळे तसेच साप विंचु आदिमुळे मुलांना शाळेत जाताना भिती वाटते.दुपारी शेतातील कामं सोडून मुलांना घरी आणण्यासाठी यावं लागतं.आमच्या लेकरांच्या शिक्षणिसाठी शासनाने आमची रस्त्याची अडचण दुर करावी.

शाळा प्रवेशोत्सव निमित्त भेटी देणारे  उप शिक्षणाधिकारी माजेद काझी शिंदेवस्ती मुलांच्या व्यथा जाणून घेतली काय?? :- डॉ.गणेश ढवळे 

नविन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात व आनंदाने करणे आवश्यक असुन शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करत विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प वाटपासह विविध उपक्रमांचे नियोजन करण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत.या अनुषंगाने जिल्हा स्तरावरून तालुक्यांना भेटी देण्यासाठी आधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असुन बीड तालुक्यासाठी उपशिक्षणाधिकारी माजेद काझी यांची निवड करण्यात आली असुन ते कामखेडा गावातील शिंदे वस्ती वरील विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेतील काय?? असा सवाल डॉ.गणेश ढवळे यांनी केला आहे.