29 ऑगस्टपासूनचा बेमुदत संप पुढे ढकलला

ताज्या बातम्या

29 ऑगस्टपासूनचा बेमुदत संप पुढे ढकलला

By admin

August 28, 2024

मुंबई

29 ऑगस्टपासूनचा बेमुदत संप पुढे ढकलला : 29 ऑगस्ट रोजी राज्य कर्मचारी महासंघाने राज्यव्यापी बेमुदत संप करण्याचे ठरवले होते. मात्र हा बेमुदत संप संस्थगित करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य सरकारी-निमसरकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने स्पष्ट केले.

 काल समन्वय समितीची विस्तृत आभासी सभा(online)श्रेयस चेंबर्स, डी.एन.रोड, फोर्ट मुंबई येथे पार पडली.

  दि.२७/८/२०२४ रोजी दु.०१.०० वा.मा.मुख्यमंत्री महोदय यांचेशी प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा झाली. राज्य शासनाने अर्थसंकल्पिय अधिवेशनात पटलावर ठेवल्यानुसारच सुधारीत निवृतीवेतन योजना राबविली जाईल; असे अभिवचन देऊन, इतर विषयांबाबत निर्णायक चर्चा सध्याच्या माझ्या व्यस्ततेमुळे दोन/तीन दिवसांनंतर संपन्न होईल, असे  स्पष्ट केले.

 समन्वय समितीच्या विस्तारीत सभेत- मा.मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केल्यानुसार अपेक्षित निर्णय घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देणे योग्य राहील; असा ठराव मंजूर झाला.

त्यामुळे दि.२९ ऑगस्ट पासूनच्या नियोजित संपाची बदललेली पुढील तारीख ४ सप्टेंबर रोजी समन्वय समितीची विस्तारीत सभा पुन्हा घेऊन ठरविण्यात येईल.

बेमुदत संपापूर्वी आज मुख्यमंत्री यांचे समवेत झालेल्या बैठकीमध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे  श्री.विश्वास काटकर, श्री.अशोक दगडे, श्री.गणेश देशमुख, श्री.सुधाकर सुर्वे व श्री.सरतापे  राजपत्रित अधिकारी संघटनेतर्फे श्री.कुलथे श्री.देसाई व श्री.भाटकर आदि सहभागी झाले होते.