teachers day tension

शिक्षण

शिक्षक दिनी काळ्याफिती लावून वर्ग अध्यापन करावे:- बा.म.पवार

By admin

September 04, 2023

 

आष्टी,

teachers day tension राज्यातील शालेय शिक्षण विभाग हा सध्या आणि फक्त व्हाट्सअप वर चालत असून सर्व परिपत्रके व सर्व माहिती व्हाट्सअप द्वारे शाळांना पुरविण्यात येत कोणत्याही प्रकारचे परिपत्रक लेखी स्वरूपात पुरविण्यात येत नाही.

परिणामी व्हाट्सअप वरील परिपत्रक वाचताना व त्याचे अवलोकन करताना शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी यांचा अवास्तव वेळ त्यामध्ये जात असून व्हाट्सअप प्रशासनाला सर्वजण वैतागले आहेत.

परिणामी भविष्यात याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या डोळ्यावर व डोक्यावर होत असून काही शिक्षकांना ब्रेन ट्यूमर सारखे आजार होताना दिसून येत आहेत एकूणच व्हाट्सअप प्रशासनाला सर्वच कर्मचारी वैतागले आहेत.

बीड जिल्ह्यातून अण्णासाहेब घोडके राज्य पुरस्काराचे मानकरी; राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार

त्यामुळे ही प्रथा बंद करून तसेच राज्य शासन व शालेय शिक्षण विभागाकडून अशैक्षणिक कामाचा सातत्याने होत असणारा भडीमार ऑनलाइन शासनादेश ऑनलाइन परिपत्रके ऑनलाईन माहिती कधीही उठ सूट व्हाट्सअप वरती रात्री अप, रात्री सूचना आता द्या, तात्काळ द्या, अति महत्त्वाचे ,अति तातडीचे ,प्रथम प्राधान्य, शालाबाह्य विद्यार्थी, साक्षर भारत योजना, मतदार यादी ,स्वच्छ भारत सुंदर भारत, शालेय पोषण आहार, विविध विद्यार्थी लाभाच्या योजना ऑनलाइन प्रशिक्षणे अशा एक ना अनेक कामामुळे विद्यार्थ्यांना वर्ग अध्यापन करत असताना बहुतांशी शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा वेळ अशैक्षणिक कामात जात आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याला सर्वस्वी जबाबदार राज्य शासन आणि शिक्षण विभाग असल्याने आता आम्हाला वर्ग अध्यापनाला वेळ द्या विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा टिकू द्या आणि एक गडी व बारा भानगडी असे चाललेले हे प्रशासन व्यवस्था बंद करा, अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त आशैक्षणिक कामाचा बोजा कमी करा या न्याय मागणीसाठी सर्वत्र शाळा स्तरावर काळ्याफिती लावून काम करण्याचे आवाहन शिक्षक नेते बा. म. पवार यांनी केली आहे .

teachers day tension ताणतणावाच्या प्रशासनामुळे सुरुडी शाळेचे मुख्याध्यापक तोतरे पुणे येथे उपचारासाठी दाखल

सुरडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गहिनीनाथ तोतरे हे कर्तव्यावर असताना त्यांना अचानक मानसिक त्रास झाला प्रशासकीय वेळोवेळी मागितली जाणाऱ्या माहितीने मुख्याध्यापक व शिक्षक ताणतणावात येत असून विद्यार्थ्यांचे अध्यापन होत नसून अ शैक्षणिक कामे वाढत चालले आहेत .

अशा या दुहेरी कामामुळे मुख्याध्यापकावरील वाढत्या ताणतणावामुळे डोईठाण केंद्रातील सुरडी शाळेचे मुख्याध्यापक गहिनीनाथ तोतरे यांना दोन दिवसापूर्वीच ताण-तणावामुळे पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा अध्यापनाव्यतिरिक्तचा ताण तणाव कमी करावा अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेचे संघटक संतोष दानी यांनी केली आहे.