ताज्या बातम्या

Teacher bharti आगामी  शिक्षक भरती विभागवार होणार-शिक्षणमंत्री

By admin

December 28, 2022

Teacher bharti आगामी  शिक्षक भरती विभागवार होणार-शिक्षणमंत्री

नागपूर

Teacher bharti  शिक्षकांची भरती करताना विभाग पद्धतीने भरले जातील त्यामुळे त्याबाहेर त्यांना बदली दिली जाणार नाही, परिणामी शिक्षकांची पदे रिक्त राहणार नाहीत असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. विधान सभेतील लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. एकदा भरती झाली की नंतर आपल्या जिल्ह्यात बदली करून घेतली जाते परिणामी संबधित जिल्ह्यात शिक्षक तुटवडा निर्माण होतो हे यात टाळलं जाईल असं केसरकर म्हणाले. सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अत्यावश्यक आहे मात्र   सीबीएसी अथवा तत्सम शाळांमध्ये दहावी साठी ते शिथिल करण्याची मागणी आली आहे त्यावर विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं.

मुंबई परिसरात अतिरिक्त ठरलेले शिक्षक भिवंडी पालिका हद्दीतील रिक्त पदे भरण्यासाठी पाठवले जातील असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं, ही लक्षवेधी रईस शेख यांनी मांडली होती. शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असल्याचे ही मंत्र्यांनी स्पष्ट केलं.