ताज्या बातम्या

राज्य शिक्षक पुरस्कारात अहमदनगर जिल्ह्याला 4 पुरस्कार

By admin

September 02, 2024

अहमदनगर

राज्यातील 110 राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा आज शासनाच्या वतीने करण्यात आली. यामध्ये प्राथमिक विभागातील 39 माध्यमिक विभागातील 39 आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक 19 थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार 8 विशेष शिक्षक कला क्रीडा दोन दिव्यांग शिक्षक एक आणि स्काऊट गाईड शिक्षक दोन अशा एकूण 110 पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 4 शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

 माध्यमिक आणि प्राथमिक दोन्ही गटातील पुरस्कार शेवगाव तालुक्यातील शिक्षकांनी मिळवले आहे यामध्ये प्राथमिक विभागातून शुभांगी भाऊसाहेब शेलार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगाव मराठी मुली यांची तर माध्यमिक विभागातून उमेश गोपीनाथ घेवरीकर पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल शेवगाव यांची निवड करण्यात आली आहे घेवरीकर हे उपक्रम शिक्षक उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी आतापर्यंत शिक्षण क्षेत्राबरोबर नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.

आदिवासी क्षेत्रातील शिक्षक पुरस्कार पुष्पा शिवराम लांडे यांना आणि पुणे विभागातून नगरपालिका पुरस्कार विभागात सुनीता भाऊसाहेब इंगळे नगरपालिका शाळा कोपरगाव यांना जाहीर झाला आहे.