ssc hsc exam news

ताज्या बातम्या

ssc hsc exam news कॉपी साठी मदत करणाऱ्या पर्यवेक्षक आणि संबंधित यंत्रणेवर कारवाई होणार 

By admin

February 18, 2023

कॉपी साठी मदत करणाऱ्या पर्यवेक्षक आणि संबंधित यंत्रणेवर कारवाई होणार

अहमदनगर

ssc hsc exam news  कॉपीमुक्त वातावरणात दहावी आणि बारावीच्या परीक्षा व्हाव्यात यासाठी शिक्षण विभागासह प्रशासन कार्यरत आहे.काही दिवसात होऊ घातलेल्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेमध्ये कॉपी साठी पूरक काम करणाऱ्या शिक्षक आणि परिवेक्षेयकीय यंत्रणेवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले.

राज्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.त्याच अनुषंगाने जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात यासाठी महसूल, जिल्हा परिषद आणि पोलीस यंत्रणा एकत्रितपणे काम करणार आहे.जिल्ह्यातील कॉपीचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केले आहेत.

त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,पोलीस अधीक्षक राजेश ओला,माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले की,महसूल पोलीस आणि जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे.कॉपीमुक्तीच्या नांदेड पॅटर्नच्या धरतीवर अहमदनगर जिल्ह्यात यंत्रणा राबवण्यात येणार आहेे. यायासाठी जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय सहा भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच तालुकास्तरावर तहसीलदार ग्रामविकास अधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांचे भरारी पथक तयार करण्यात आली आहेत.

जिल्हास्तरीय सहा भरारी पथकामध्ये जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालील पथक त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनाखालील पथक शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मार्गदर्शनाखालील पथक शिक्षणाधिकारी योजना यांचे पथक शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे पथक आणि जिल्हा शिक्षण संस्था म्हणजेच डायट यांचे एक पथकअसे मिळून सहा पथके असणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून दहा मीटर परिसरात झेरॉक्स आणि फॅक्स यांची केंद्रे बंद असणार आहेत.परीक्षापूर्वी परीक्षार्थी दालनात प्रवेश करण्यापूर्वी त्याची झेडपी घेतली जाणार आहे.

त्यानंतरच त्याला दालनामध्ये प्रवेश दिला जाणार आहेत.तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर बैठे पथक नेमण्यात येणार असून जिल्ह्यातील 16 संवेदनशील केंद्र तयार करण्यात आली आहेत. या संवेदनशील केंद्रांवर पूर्ण वेळ व्हिडिओ शूटिंग केली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये इयत्ता बारावीचे 108 केंद्र असून या परीक्षा केंद्रावर 63 हजार 313 विद्यार्थी परीक्षा देत आहेत तर जिल्ह्यामध्ये दहावीचे 179 केंद्र असून या केंद्रांवर  69,534 विद्यार्थी  प्रविष्ट झालेले आहेत.या सर्व केंद्रांवर पोलिसांची नजर असणार असून मात्र पोलिसांना परीक्षेच्या दालनामध्ये प्रवेश असणार नाही.

बोर्डाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच सकाळी साडेदहा वाजता आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित अनिवार्य असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी सांगितले.