ताज्या बातम्या

solapur update फटाका कारखान्यास आग ,3 लोकांचा मृत्यू तर 12 लोक गंभीर जखमी

By admin

January 01, 2023

solapur update फटाका कारखान्यास आग ,9 लोकांचा मृत्यू तर 12 लोक गंभीर जखमी

सोलापुर

solapur update जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असणाऱ्या पांगरी येथील फटाका कारखान्याला भीषण आग कारखान्यातील 40 कामगारांपैकी 3 जण मृत्युमुखी तर 12 कर्मचारी गंभीर जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी जवळ जवळ फटाक्याच्या कारखान्याला मोठी भीषण आग लागली. फटाके तयार करत असताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. फटाके कारखान्यालाच आग लागल्याने संपूर्ण परिसरात मोठे आगीचे लोट आणि धुराडे पसरले. हे धुराडे दूरपर्यंत दिसून येत होते. आग लागण्यापूर्वी या कारखान्यामध्ये सुमारे 40 हून अधिकचे कर्मचारी काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत तात्काळ अग्निशामक दल हे घटनास्थळी दाखल झाले असून , आग आटोक्यात आणण्यात यश प्राप्त होत आहे.