ताज्या बातम्या

श्रीगोंदे येथे डाकूने लोकांचे लक्ष वेधले

By admin

March 14, 2026

ऋषिकेश भास्कर सांगळेश्रीगोंदा शहर प्रतिनिधी

जिल्हा परिषद अहिल्यानगर – पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती श्रीगोंदा यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन – २०२६, कोळगाव येथे संपन्न.

जिल्हा परिषद अहिल्यानगर, पशुसंवर्धन विभाग तथा पंचायत समिती श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने कोळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन–२०२६ मध्ये विविध जातींच्या पशुपक्ष्यांचे आकर्षक प्रदर्शन करण्यात आले.

सदर प्रदर्शनामध्ये “आरण्यागिरी रिसॉर्ट” तर्फे सादर करण्यात आलेल्या तिबेटीअन बखरवाल जातीच्या “डाकू” नावाच्या श्वानाने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

सिंहासारखी दाट आयाळ, प्रभावी देहयष्टी व दमदार व्यक्तिमत्त्वामुळे “डाकू” प्रदर्शनात उपस्थित असलेल्या इतर श्वानांपेक्षा वेगळा ठरला. त्याच्या प्रभावी उपस्थितीमुळे उपस्थित प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली.

प्रदर्शनात सहभागी झाल्यानंतर परीक्षक मंडळाने त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांध्याचे व देखणेपणाचे कौतुक करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान केले.

या प्रसंगी विद्यमान लोकप्रिय आमदार मा. विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी “डाकू” विषयी माहिती जाणून घेत त्याचे विशेष कौतुक केले. तसेच गटविकास अधिकारी मा. राणी फराटे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. गोरख सातकर, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीधर गादेवार, ज्येष्ठ नेते दिनूकाका पंधरकर, तसेच पिंपळगाव पिसा येथील सरपंच किशोरराव पंधरकर यांनीही “डाकू”चे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

सदर प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पेडगाव पशुधन पर्यवेक्षक डॉ. अश्विनी गायकवाड मॅडम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

आरण्यागिरी रिसॉर्टचे मालक इंजि. संकेत अरुण काळे यांच्या वतीने सागर शितोळे यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवून “डाकू” या श्वानासाठी प्रदान करण्यात आलेले प्रथम पारितोषिक स्वीकारले.