ताज्या बातम्या

अपयश, कोरोना आणि संघर्षावर मात: ‘जागरण गोंधळ’ हॉटेलमागील तरुण उद्योजकाची प्रेरणादायी वाटचाल

By admin

December 25, 2025

“”.

ऋषिकेश भास्कर सांगळे.शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा.

“परिस्थिती कठीण होती, पण जिद्द त्याहून मोठी होती…”👉 “स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही कहाणी प्रेरणा आहे…”

श्रीगोंदा – गरिबी, अपयश, कोरोना महामारी आणि अनेक अडचणींवर मात करत स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे उभा करणाऱ्या तरुण उद्योजकाची ही कहाणी आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मांडवगण रोडवरील ‘जागरण गोंधळ’ हॉटेलचे मालक श्री. महेश कदम यांचा प्रवास अत्यंत खडतर असला, तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उदरनिर्वाहासाठी लहान वयातच संघर्षाला सुरुवात झाली. स्वतःच्या कष्टावर काहीतरी उभं करायचं स्वप्न मनाशी बाळगून त्यांनी सर्वप्रथम श्रीगोंदा येथील काळकाई चौक येथे ‘रॉयल कॅफे’ या नावाने व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने व्यवसाय उभारी घेत होता.

मात्र, कोरोना महामारीच्या काळात कॅफे व्यवसाय अचानकपणे पूर्णतः मंदावला. आर्थिक अडचणी वाढल्या आणि परिस्थिती इतकी बिकट झाली की काही काळ व्यवसायापासून दूर राहावं लागलं. कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे पुन्हा उभं राहणं आवश्यक बनलं.

यानंतर काही काळासाठी पुणे येथे नोकरीसाठी स्थलांतर करण्यात आलं. मात्र, मनातली उद्योजकतेची ओढ आणि स्वतःचा व्यवसाय करण्याची जिद्द त्यांना शांत बसू देत नव्हती. नोकरी करत असतानाही मन कायम स्वतःच्या व्यवसायाकडेच लागलेलं होतं.

याच जिद्दीमधून त्यांनी पुन्हा एकदा नवीन धाडस करत ‘जागरण गोंधळ’ या नावाने हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली. मांडवगण रोड परिसरात सुरू झालेल्या या हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी तसेच चवदार नॉनव्हेज जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली असून, घरगुती चव, स्वच्छता आणि प्रामाणिक सेवा यावर विशेष भर देण्यात आला आहे.

हॉटेलचे मालक श्री. महेश कदम म्हणाले,“ग्राहकांना स्वच्छ, ताजं आणि घरगुती वातावरणात जेवण मिळावं, हा आमचा मुख्य उद्देश आहे. प्रवासी, कुटुंबीय तसेच स्थानिक नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात दर्जेदार सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

आज ‘जागरण गोंधळ’ हॉटेल अल्पावधीतच मांडवगण रोड परिसरात प्रवासी, कुटुंबीय आणि खाद्यप्रेमींच्या पसंतीस उतरू लागले असून, अपयशावर मात करून उभा राहिलेल्या संघर्षाचा विजय म्हणून या हॉटेलकडे पाहिलं जात आहे.

महेश कदम यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर यश नक्की मिळतं, हेच या कहाणीतून स्पष्ट होतं.

📍 पत्ता: मांडवगण रोड, तालुका – श्रीगोंदा, जिल्हा – अहिल्यानगर.🍽️ सेवा: शाकाहारी व नॉनव्हेज जेवण👤 मालक: श्री. महेश बाळासाहेब कदममो. 9130969666