shivaji maharaj rangoli

विशेष वृत्त

shivaji maharaj rangoli सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज यांची 25 हजार स्क्वेअर फुटांवर रांगोळी

By admin

February 19, 2023

 

बीडच्या माजलगाव शहरातील भव्य प्रतिमा Drone च्या माध्यमातून विहंगम दृश्य

बीड

shivaji maharaj rangoli बीडच्या माजलगावात शहरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज यांची 25 हजार स्क्वेअर फुटांवर रांगोळीतून shivaji maharaj jayanti rangoli भव्य प्रतीमा साकारली आहे.

shivaji maharaj rangoli in beed शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या shivaji maharaj rangoli majalgaon  प्रांगणात शिवजन्मोत्सव shivjayanti  समितीचे प्रमुख बाळू ताकट यांच्या संकल्पनेतून, ही रांगोळीतून 25 हजार स्क्वेअर फुटांवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारलीय.

तब्बल 60 क्विंटल रांगोळीच्या माध्यमातून आठ दिवस ही रांगोळी पूर्ण करण्यास वेळ लागला असून आठ कारागीराणी हे काम केले आहे. तर सुंदर फोटो पाहण्यासाठी माजलगाव व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

परभणी येथील छञपती आर्ट् ग्रुप मधील कैलास राखोंडे, मारुती भैरट, वैष्णवी पांचाळ, अंबिका गायकवाड , मिथुन आडे, केशव वरणे, अनुष्का चांदेल, गणेश शेजूळ या 8 कलाकारांनी ही प्रतिमा रांगोळीद्वारे साकारलीय.

majalgaon शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 5 वाजता शिवप्रेमींसाठी ती खुली करण्यात आलीय.

शिवजन्मोत्सव नेहमी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आमचा मानस असतो त्यातूनच ही रांगोळी मध्ये भव्य प्रतिमा साकारण्याची संकल्पना सुचली आणि त्याला परभणी येथील कलाकारांनी आठ दिवसाची मेहनत घेऊन योग्य आकार दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रतिमा साकारता आली असेल संयोजक बाळू ताकट यांनी सांगितले.