shirur koregaon accident four dies

ताज्या बातम्या

shirur koregaon accident four dies गुरुकुलच्या कुटुंबावर शोककळा; भोंवे कुटुंबातील चौघांचा मृत्यू,

By admin

February 21, 2023

पुण्यात भीषण अपघात ! एकच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील घटना

शिरूर

shirur koregaon accident four dies पुणे-नगर रस्त्यावर असणाऱ्या कारेगाव येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर वर मागच्या बाजूने कार आदळून झालेल्या अपघातात एकच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

सुदाम शंकर भोंडवे (वय ६६), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय ६०), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय ३२) व आनंदी अश्वीन भोंडवे (वय ४ वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघातात अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) हे गंभीर जखमी झाले आहेत. ते स्वतः गाडी चालवत होते. त्यांच्यावर कारेगावं येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

shirur koregaon accident four dies

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अनेक की, अश्विन भोंडवे हे चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी व मुलगी आनंदी यांच्यासह इंडिका मोटारीतून (क्र. एमएच १२ ईएम २९७८) चाकणकडे चालले होते. दुपारी साधारण साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला आहे. कारेगाव जवळ आल्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर क्र. एमएच ४३ बीजी २७७६ वर त्यांची मोटार आदळली. कारचा वेग अधिक असल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घतांस्थली धाव घेतली. कंटेनर मध्ये अडकलेली गाडी क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढली. स्थानिक तरूणांच्या मदतीने जखमी व मृतांना बाहेर काढले. अपघातानंतर काहीवेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वेळेत घटना स्थळी पोहचून मदत कार्य केले आणि वाहतूक सुरळीत केली. या अपघाताने एक कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.

१९८४ साली सुदाम भोंडवे हे राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या आणि दीनदयाला शोध संस्थान चे संस्थापक नानाजी देशमुख यांच्या सेवा कार्याच्या माध्यमातून संपर्कात आले आणि आपलं किराणा मालाचा व्यवसाय बंद करून वडिलोपार्जित सात एकर शेती जमीन ही दीनदयाल शोध संस्थान च्या सेवा कार्यास समर्पित केली.

बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांना आणि वंचित गरीब मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १९८६ साली सोनदरा गुरुकुलम ची gurukul beed  सुरुवात केली.. तिला सतरा विद्यार्थी असलेल्या या गुरुकुलाच्या संख्या 200 पेक्षा अधिक आहे श्री सुदाम भोंडवे आणि त्यांच्या पत्नी मागील 35 वर्षांपासून हजारो वंचित आणि ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वृत्त पूर्ण वेळ कार्य करत होते..