पुणे
Scert band competition राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरावर आयोजित करण्यात आलेल्या बँड स्पर्धा आज उत्साहात संपन्न झाल्या.
समग्र शिक्षा अंतर्गत राज्यस्तरीय बँड स्पर्धा दि.17 नोव्हेंबर 2023 रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन scert pune परिषदेचे संचालक श्री. अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले.सहसंचालक श्री. रमाकांत काठमोरे , श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे उपसंचालक सुहास पाटील,उपसंचालक डाॅ.नेहा बेलसरे , डॉ . कमलादेवी आवटे, डॉ.शोभा खंदारे, विभागप्रमुख सचिन चव्हाण , तेजस्विनी आळवेकर, डॉ . प्रभाकर क्षिरसागर, अधिव्याख्याता डॉ.ज्योती राजपूत, मनिषा ताठे, वृषाली गायकवाड आदी मान्यवर अधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्व सहभागी संघांनी वाद्यवादनाव्दारे संचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली.उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती राजपूत यांनी केले.
राज्यातून 11 संघ बँड स्पर्धेसाठी सहभागी झाले.310 विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सादरीकरण केले.21 शिक्षकांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. भैरव दाभाडे, वाहिद पिरजादे, विठ्ठल माने या पोलीस प्रशासनातील अधिकारी यांनी सदर स्पर्धेचे परीक्षण केले. तत्पूर्वी राज्यस्तरावर झालेल्या उपांत्य फेरीत 66 संघ सहभागी झाले होते. त्यातील 12 संघ राज्यस्तरीय बँड स्पर्धेसाठी विजेते ठरले होते.
सदर स्पर्धेचे संयोजन संचालक श्री. अमोल येडगे, सहसंचालक श्री. रमाकांत काठमोरे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनात कला व क्रीडा विभागातील उपसंचालक डाॅ.नेहा बेलसरे ,विभागप्रमुख सचिन चव्हाण, अधिव्याख्याता डॉ.ज्योती राजपूत, विषय सहाय्यक पदमजा लामरुड यांनी केले. विषय साधनव्यक्ती प्रदीप देवकाते, अविनाश महाजन यांनी स्पर्धेच्या संयोजनात सहाय्य केले. दत्तात्रय कसबे, संपद साळुंखे यांनी स्पर्धेच्या सुशोभनासाठी व आयोजनात सहाय्य केले. संपूर्ण सादरीकरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार, नियोजन पद्मजा लामरुड यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – पाईप बँड स्पर्धा – प्रथम क्रमांक (मुले) – पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, वर्धा. प्रथम क्रमांक (मुली) – अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू, विक्रोळी
ब्रास बँड स्पर्धा – प्रथम क्रमांक (मुले) – डॉन बॉस्को हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, विक्रोळी प्रथम क्रमांक (मुली) – पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, सातारा.