चिऊ वाचवा

ताज्या बातम्या

आजच्या युगात चिवचिवाट हरवतोय; ‘चिऊ वाचवा’ उपक्रमातून संवर्धनाचा संदेश

By admin

March 20, 2026

राजूर, ता. २० :

आजच्या आधुनिक युगात एकेकाळी अंगणात चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या आता शहरांसह ग्रामीण भागातूनही लुप्त होताना दिसत आहेत. पर्यावरणातील प्रत्येक जीवाचे अस्तित्व महत्त्वाचे असल्याची जाणीव ठेवत राजूर येथील श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘पक्षी वाचवा, चिमणी वाचवा’ अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात पक्ष्यांसाठी घरटी तयार करणे, पाणीपात्र ठेवणे, धान्य वाटप आदी कार्यक्रम राबविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या श्रीमती रजनी टीभे, निसर्गप्रेमी रमाकांत डेरे तसेच आदिवासी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ साबळे प्राचार्य किरण भागवत,सतीश काळे,विनायक साळवे,सुनीता पापळ सोमनाथ पंडित उपस्थित होते.

चिऊ वाचवा

उठा उठा चिऊताई’, ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ यांसारख्या कवितांपासून पंचतंत्रातील गोष्टींपर्यंत विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. टाकाऊ वस्तूंपासून घरटी बनविण्याचे प्रशिक्षण, छायाचित्रांवरून पक्षी ओळखण्याचे खेळ यामुळे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘जीवदया व स्वामी समर्थ शिक्षण संस्थे’तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते अनिकेत चांडोले व विवेक जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना, शाळांना व मंदिरांना अल्प किमतीतील घरटी मोफत वितरित केली.

68th maharashtra kesari kusti सिकंदर शेख, शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळची विजयी सलामी

प्रसंगी अनिकेत चांडोले यांनी सांगितले की, चिमण्यांना पिण्यासाठी व अंघोळीसाठी पाणी तसेच धुळीची आवश्यकता असते. मात्र काँक्रिटीकरणामुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम झाला आहे. चिमण्या पिलांना प्रथिनयुक्त अन्नाऐवजी उरलेले अन्न देत असल्याने त्यांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी निरीक्षण मांडले.

प्राचार्या सौ. मंजुषा काळे यांनी पर्यावरणपूरक विकास, देशी वृक्ष लागवड व सेंद्रिय शेतीचा अवलंब हे चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाय असल्याचे सांगितले.दरम्यान, राजूर येथील अनिकेत चांडोले या तरुणाने ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर केवळ ११० रुपयांत पर्यावरणपूरक चिमणी घरटे तयार करून संवर्धनाचा अभिनव प्रयोग राबविला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण भागवत यांनी केले, तर आभार कुमारी कांचन माळवे यांनी मानले. या उपक्रमात सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.