छत्रपती संभाजी नगर,
samruddhi mahamarg accident news छत्रपती संभाजी नगरच्या समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यात काही लहान बालकांचा देखील समावेश आहे. सैलानी येथील दर्गाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला असल्याचे कळत आहे.
समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्याजवळ एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दहा ते बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. धक्कादायक म्हणजे अपघातात मृत व्यक्तींमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. ट्रॅव्हल्समध्ये एकूण 30 जण प्रवास करत होते.
श्री योगेश्वरी देवीच्या दसरा महोत्सवास रविवार पासून प्रारंभ
samruddhi mahamarg accident news today समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते.
ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. तर, अपघातात 10 ते 12 जणांचा मुत्यु झाला असून, ज्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच काही महिला देखील आहेत. दरम्यान वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, घटनास्थळी समृद्धी महामार्गावरील बचाव पथक, वैजापूर पोलीस देखील दाखल झाले असून, मदतकार्य सुरू आहे. या अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश असल्याचं समोर आलं आहे. तसेच काही महिला देखील या अपघातात मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. तर सर्व जखमी अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.