ताज्या बातम्या

राजा प्रजेच्या दुःखाने दुःखी झाला तर ती ईश्वराने राष्ट्राला दिलेली देणगी असते : रामराव महाराज ढोक

By admin

January 22, 2026

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

शेतकऱ्यांना खताची गोणी फाडून त्यात काय आहे हे पाहण्याचा अधिकार त्याला ठेवला नाही. खताची गोणी आपल्या पैशाने विकत घ्यायची आणि त्यात माती किंवा विटांचा चुरा भरला आहे की काय हे न पाहता आपल्या शेतात ते टाकायची अशी अवस्था आहे. शेतकरी आता मंदिरात जातो, रडतो, प्रार्थना करतो की देवा मी निसर्गापेक्षा शासन कर्त्यांना सहन केलंय. शेतकरी पाण्यात कमी आणि त्याच्या अश्रूंमध्ये जास्त वाहून गेलाय.

राजा जर प्रजेच्या दुःखाने दुःखी झाला तर समजायचे की ती ईश्वराने राष्ट्राला दिलेली देणगी आहे असे उद्गार रामायणाचार्य रामराव महाराज ढोक नागपूरकर यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे काढले.

पाथर्डीचे भूमिपुत्र व भोसरी चाकण येथील उद्योगपती भारत काशिनाथ सातपुते यांच्या 61 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित जाहीर संकीर्तनामध्ये ते बोलत होते . ते पुढे म्हणाले की, भारत सातपुते यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. तरी देखील ते आपल्या गावाला विसरले नाहीत. गाव च्या प्रगतीसाठी विकासासाठी त्यांनी भरीव असे योगदान दिले आहे.दुसऱ्याच्या दुःखात दुःखी न होणारे आठ लोक आहेत असे चाणक्य नीतिकार सांगतात.

राजा, वेश्या, यम,बालक, अग्नी, चोर, ग्रामकंटक, पण प्रजेच्या दुःखात जर राजा दुखी झाला झाला तर ती ईश्वरीय देणगी असते असे ते म्हणाले,त्या संकीर्तन सोहळ्यात पाथर्डीचे भूमिपुत्र ह. भ. प. गोरक्षनाथ महाराज उदागे, यांच्या पुणे येथील ज्ञानदा संस्कृत प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी टाळकरी सेवा दिली त्याचेही ढोक महाराजांनी तोंड भरून कौतुक केले.

ते म्हणाले की, हजारो श्रोत्यांसमोर कीर्तन करणारा कीर्तनकार मोठा नाही, तर हजारो कीर्तनकार निर्माण करणारा महाराज मोठा आहे. कारण भारत सातपुते त्यांच्यासारख्या उद्योजकांना हाताशी धरून हजारो मंदिरे उभी करता येतील पण त्या मंदिरात बसून टाळ कोणी वाजवायचे ? त्यामुळे या टाळकरी मृदुंगाचार्यांना घडवणारे महाराज मोठे आहेत.

ज्या व्यक्तीवर समाजाचे प्रेम आहे. जो नियोजित आयुष्य जगणारच आहे. पण त्याच्या नियोजित आयुष्यामध्ये अनिष्ट घडू नये या करता सर्वांनी एकत्र येऊन त्याच्यासाठी इष्ट देवाकडे केलेली सामूहिक प्रार्थना म्हणजे अभिष्टचिंतन सोहळा असतो. असे ते म्हणाले.

पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे उद्योजक भारत काशिनाथ सातपुते यांच्या एकसष्ठी निमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सातपूते यांच्या चारधाम यात्रा पुरती निमित्त वेदमंत्रासह होम हवन झाले. त्यानंतर दुपारी गावात आई-वडिलांच्या स्मरणार्थ रेणुका माता मंदिर भक्तनिवास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर वृक्षारोपण झाले. नंतर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.

या सोहळ्यासाठी आमदार मोनिकाताई राजळे, श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत ह. भ. प. आदिनाथ महाराज शास्त्री,शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, माजी उपसभापती विष्णुपंत अकोलकर, सेवानिवृत्त कृषी अधिकारी प्रभाकर पाटील, इंद्रायणी नगर येथील नाना नानी पार्क मित्र मंडळाचे चंद्रकांत दादा रासकर ,चिंबळी येथील समर्थ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन संभाजी गवारी, शिवाजीराव गवारी, उद्योजक अशोक आहेर, रमेश साळुंखे, संभाजी दरेकर, विजय खळदकर, अशोक तनपुरे, माणिकराव पडवळ, संपत घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते विनोद सपकाळ मुकुंद एकविरे, साकेगावच्या सरपंच अलकाताई सातपुते, भायेगाव जोहरापूर,खामगाव, येथील सरपंच व सर्व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

यानिमित्त भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत किशोर ढोकळे संजीव शिंदे संदीप बेलसरे यांनी त्यांना ऑनलाईन संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना भारत सातपुते म्हणाले की, आपण घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे कुटुंबासाठी काहीतरी करावे यासाठी आपले गाव सोडले. आयटीआय मुळे एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कायमस्वरूपी जॉब मिळाला. नंतर आपण नोकरी सोडून उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले आता ब्रह्मोस इस्रो सारख्या देश संरक्षणासाठीच्या प्रकल्पात स्पेअर पार्ट बनवून देण्याचे योगदान देत आपण देश सेवेत सहभागी होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे.

देवाने आपल्याला आयुष्यात भरपूर हाताने दिले निरोगी आयुष्य कौटुंबिक आनंदी सहजीवन दिले. मुलगी विदेशात डेटा सायंटिस्ट, जावई फेसबुक मेटामध्ये अमेरिकेत नोकरीस तर मुलगा आता गुगल मध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहे. आपल्या आयुष्यात एक्सष्टी निमित्त गावासाठी काहीतरी करावे यासाठी आपण गावात विकास कामे सुरू केले आहेत गावातील गुणवंतांचा सत्कार करणार आहोत. ढोक महाराजांचे कीर्तन यानिमित्त आपण ठेवले असे ते म्हणाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक साहेबराव सातपुते पाटील, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,यश फाउंडेशन अहिल्यानगर चे संचालक, अशोक देवढे, त्यांचा मित्र परिवार व नातेवाईक या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केले तर आभार गोरक्षनाथ महाराज उदागे यांनी मानले.