rohit pawar

ताज्या बातम्या

आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना घडविली किल्ले रायगडची सफर

By admin

August 28, 2022

rohit pawar रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना घडविली किल्ले रायगडची सफर

रायगड

जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या रायगड किल्ल्यावर आज दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी आमदार रोहित पवार हे आपल्या या कार्यकर्त्यांसह रायगडवर आले.

काही कार्यकर्त्यांनी पायरी मार्गाने तर आ. पवार यांच्यासह काही कार्यकत्यांनी रोप वे ने रायगड चा किल्ला गाठला.

 

rohit pawar

गडावर राजसदर, होळीचा माळ , जगदिश्वर मंदिर , शिवसमाधी  या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते नतमस्तक झाले.

गडावरील गाईडच्या मदतीने त्याचप्रमाणे स्वतः आमदार पवार यांनी गडाचा इतिहास आणि गडावरील वास्तुंची, ठिकाणांची माहिती या कार्यकर्त्यांना दिली.

drone farming in dhule ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा

कार्यकर्त्यांच्या प्रेमळ मागणीचा मान राखीत राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मतदार संघातील सुमारे चारशे कार्यकर्त्यांना किल्ले रायगडची सफर घडविली.

“‘ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पशाने पावन झालेल्या किल्ले रायगडवर येवून आम्हाला नवी उर्जा प्राप्त झाल्याच्या “‘भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्या.

गडावरील स्वच्छतेचे त्याचप्रमाणे स्थानिक नागरिक , गाईड आणि रोप वे प्रशासनाकडून शिवभक्तांना करण्यात येणाऱ्या सहकार्याचेही त्यांनी कौतुक केले.