ताज्या बातम्या

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ.गोविंद काळे रविवारी बीड दौऱ्यावर

By admin

January 27, 2024

बीड

Rajya magas aayog मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे हे एक दिवसाच्या बीड दौऱ्यावर येत आहेत.रविवारी ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असून महसूल विभागाच्या अधिग्रहण संदर्भात आणि सर्वेक्षणाचा आढावा घेणार आहेत.

अंगणवाडी सेविकांचा संप मागे: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शिष्टाईला यश

सध्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण जिल्ह्यात सुरु आहे. सर्वेक्षणात येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठक घेणार आहेत.