मुंबई :
People have shown what real Shiv Sena is खरी शिवसेना कोणाची हे जनतेने या निवडणुकीत दाखवून दिलं आहे, शिवसेनेचे मूळ मतदारांपैकी १९ टक्के मतं आम्हाला मिळाली तर चार टक्के मत त्यांच्याकडे राहिली, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निशाणा साधला. त्यांचे उमेदवार कसे निवडून आले हे सर्वांना माहित आहे. पण ठाकरेंची हा विजय तात्पूरती सूज आहे. पण सूज काही काळाने उतरते असही ते म्हणाले .
शिवसेनेचा आज ५८ व्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वरळीच्या एनएससीआय सभागृहात आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते .
तेरा जागावर शिवसेना आणि उबाठा गट समोरासमोर लढले त्यात सात जागा आपण जिंकलो. आपला स्ट्राईक रेट 47 टक्के आहे. तर त्यांचा स्ट्राईक रेट आहे 42 टक्के. त्यांना तेरा जागेवर 7 लाख मतं मिळाली. तर आपल्या तेरा उमेदवारांना 62 लाखं मतं मिळाली अशी आकडेवारीही मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडली. त्यामुळे त्यांच्यापेक्षा खरी शिवसेना कोण हे हे स्पष्ट झाल्याच त्यानी सांगितलं.
शिवसेना महाराष्ट्रात वाढली. ठाणे, कोकण, संभाजीनगर हे शिवसेनेचे बालेकिल्ले अबाधित राहिलेत. कोणी म्हणत होतं ठाणे, कल्याणमध्ये शिवसेनेचा पराभव होईल, पण दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवला. हा विजय घासून फुसून नाही तर ठासून विजय आहे. कोकणात ठाकर सेनेला एकही जागा जिंकता आलेली नाही असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.
शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे. शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांचं मनापासून आभार मानतो. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी उठाव केला तो खऱ्या अर्थाने या निवडणूकीत जनतेने शिक्कामोर्तब केल्याचही शिंदे म्हणाले .
वारसा सांगणाऱ्यांना आज हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे. त्यांना हिंदूत्वाची अॅलर्जी आली आहे. शिवतीर्थावर भाषण करताना देखील संपूर्ण इंडिया आघाडी होती. आज वर्धापण दिनीही तमाम हिंदू बांधव म्हणण्याची त्यांना हिंमत नव्हती. बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागण्याचा त्यांना अधिकार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केला. म्हणून धनुष्यबाण पेलण्याची ताकत मनगटात लागते ती ताकद आपल्या धनु्ष्यबाणात आहे. म्हणून लोकांनी आपल्यावर लोकांनी विश्वास दाखवला. लोकसभेच्या सात जागा आपण जिंकलो, आपण आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो. माझा आत्मविश्वास होता. पण आता मागचं सगळं विसरुन महायुती मजबूत करायची आहे असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.