ताज्या बातम्या

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी

By admin

July 01, 2024

मुंबई

Pankaja Munde’s candidature for Legislative Council लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झालेल्या बीड जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांना भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे.

आगामी विधान परिषेदेच्या पाच जागांसाठी भारतीय जनता पार्टीने हे उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये परिणय फुके ,योगेश टिळेकर ,अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांचा समावेश आहेत .