Panchayat Season 3 Official Trailer

ताज्या बातम्या

पंचायत वेब सिरीजची प्रतीक्षा संपली

By admin

May 16, 2024

Panchayat Season 3 Official Trailer अमेझोन प्राईम वर पंचायत सिरीयल ने यश मिळवल्यानंतर आता या वेब सिरीज चा तिसरा भाग येत आहे. येत्या 28 मे रोजी ही वेब सिरीज लांच होत आहे. साध्या आणि सरळ भाषेत ग्रामीण भागातील गावगुंड्या आणि गावातील राजकारण याला फोडणी देणारी विनोदी पात्र या मुळे ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंदीला उतरली आहे.

प्राइम व्हिडिओ इंडिया प्रस्तुत पंचायत सीझन 3 चा अधिकृत ट्रेलर आला असून यामध्ये त्यांनी पुढील आकर्षण बद्दल सांगितले आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका यांच्या प्रमुख भूमिका असून अरुणाभ कुमार निर्मित दिग्दर्शित दीपक कुमार मिश्रा चंदन कुमार यांनी लिहिले आहे.

प्राइम व्हिडिओ इंडियावर अधिकृत प्रकाशन तारीख 28 मे 2024.

पंचायत निवडणुका जवळ आल्या की, प्रधान आणि भूषण या दोन्ही टोळ्या आपली सार्वजनिक प्रतिमा उंचावण्यासाठी जोरदार लढाईत गुंततात. फुलेराच्या राजकारणाच्या गढूळ पाण्यात नॅव्हिगेट करून अभिषेक आपली वस्तुनिष्ठता टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.